जाहिरात

Mumbai Mayor: मुंबईत 44 वर्षांनंतर भाजपचा महापौर! रितू तावडे महापौरपदी तर संजय घाडी उपमहापौरपदी विराजमान

Mumbai Mayor Election 2026 Updates: मुंबईच्या महापौरपदी भाजपच्या रितू तावडे यांची बिनविरोध निवड झालीय.

Mumbai Mayor: मुंबईत 44 वर्षांनंतर भाजपचा महापौर! रितू तावडे महापौरपदी तर संजय घाडी उपमहापौरपदी विराजमान
"Mumbai Mayor Election 2026 Updates: भाजपच्या रितू तावडे मुंबईच्या महापौरपदी विराजमान"
NDTV Marathi

Mumbai Mayor Election 2026 Updates: देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेवर (BMC Mayor Election 2026) अखेर भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) महायुतीने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. भारतीय जनता पक्षाच्या रितू तावडे (Ritu Tawde News) यांची मुंबईच्या महापौरपदी, तर शिवसेना (एकनाथ शिंदे गट) पक्षाचे संजय घाडी यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीमुळे भाजपने तब्बल 44 वर्षांनंतर महापौरपद आपल्याकडे खेचून आणले आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी 7 फेब्रुवारी 2026 रोजी अर्ज भरण्याची प्रक्रिया पार पडली. भाजपकडून रितू तावडे आणि शिंदे गटाकडून संजय घाडी यांनीच केवळ आपले अर्ज दाखल केले होते. विरोधी पक्षांनी आपला उमेदवार उभा न केल्याने ही प्रक्रिया बिनविरोध पार पडली. यानंतर 11 फेब्रुवारी रोजी अधिकृतपणे या नावांची घोषणा करण्यात आली.

कोण आहेत रितू तावडे? 

रितू तावडे या भाजपच्या मुंबईतील एक आक्रमक आणि अनुभवी नेत्या म्हणून ओळखल्या जातात. वर्ष 2012मध्ये घाटकोपर प्रभाग क्रमांक 121 मधून त्यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली होती आणि त्या निवडूनही आल्या होत्या. यानंतर वर्ष 2017मध्ये प्रभाग क्रमांक 127 मधून त्यांनी विजय मिळवला होता. वर्ष 2026च्या निवडणुकीमध्ये रितू तावडे यांनी प्रभाग क्रमांक 132 मधून विजय मिळवलाय. यापूर्वी त्यांनी मुंबई महापालिकेच्या शिक्षण समितीचे अध्यक्षपदही भूषवले आहे. 

मुंबई महापालिकेच्या उपमहापौरपदी संजय घाडी यांची निवड 

मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांची प्रतिक्रिया VIDEO

रितू तावडे यांचे शिक्षण किती? | Ritu Tawde Education

53 वर्षीय रितू तावडे यांनी निवडणुकीसाठी दाखल केलेल्या शपथपत्रामध्ये नमूद केलंय की, त्यांचे शिक्षण 12वी पर्यंत झाले आहे. वर्ष 1993 साली आचार्य मराठे कॉलेजमधून त्यांनी इयत्ता बारावीचे शिक्षण पूर्ण केले आहे. विद्याविहारच्या रहिवासी असलेल्या रितू तावडे या व्यापार क्षेत्रामध्ये कार्यरत असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. 

रितू तावडे यांच्या कुटुंबाकडे किती संपत्ती आहे ? | Ritu Tawde Net Worth

रितू तावडे यांच्या कौटुंबिक आर्थिक स्थितीबद्दलही प्रतिज्ञापत्रात माहिती देण्यात आलीय. रितू तावडे कुटुंबाकडे एकूण 5 कोटी 26 लाख 67 हजार 417 रुपयांची मालमत्ता आहे. यामध्ये 2 कोटी 82 लाख 42 हजार 417 रुपयांची जंगम मालमत्ता आणि 2 कोटी 44 लाख 25 हजार रुपयांच्या स्थावर मालमत्तेचा समावेश आहे. तावडे कुटुंबावर सार्वजनिक आणि शासकीय वित्तीय संस्थांचे मिळून एकूण 3 कोटी 2 लाख 11 हजार 958 रुपयांचे कर्ज आहे, असे शपथपत्रात नमूद करण्यात आलंय. त्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न साधारण 14 लाख 71 हजार 870 रुपये इतके आहे.

VIDEO: भाजपच्या रितू तावडे यांनी मुंबईच्या महापौरपदी निवड

Listen to the latest songs, only on JioSaavn.com