जाहिरात

Mega project: सर्वात मोठा बोगदा! 40 मिनिटांचा प्रवास फक्त 5 मिनिटात, 'या' शहरासाठी ठरणार गेमचेंजर प्रकल्प

या भागत असलेली वाहतूक कोंडी पाहाता हा भूयारी मार्ग नोकरदारांसाठी नवसंजिवनी ठरणार असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

Mega project: सर्वात मोठा बोगदा! 40 मिनिटांचा प्रवास फक्त 5 मिनिटात, 'या' शहरासाठी ठरणार गेमचेंजर प्रकल्प
AI Image
  • ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह या महत्त्वाकांक्षी दुहेरी बोगदा प्रकल्पाला आता गती मिळाली आहे
  • गिरगाव चौपाटी ऐवजी मफतलाल जलतरण तलावाजवळील बास्केटबॉल मैदानाच्या जागेचा पर्याय मिळाला आहे
  • हा प्रकल्प दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी गेमचेंजर मानला जात आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
मुंबई:

'ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह'हा मुंबईतील पूर्व आणि दक्षिण भागाला जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. विशेष म्हणजे या दुहेरी बोगदा प्रकल्पाच्या कामाला गती आली आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक इमारतीसाठी (Technical Building) आता गिरगाव चौपाटीऐवजी मफतलाल जलतरण तलावाजवळील बास्केटबॉल मैदानाच्या जागेचा पर्याय शोधला जात आहे. 9 जून 2026 रोजी उच्चाधिकारी समितीने या संदर्भात संयुक्त स्थळ पाहणी केली आहे. गिरगाव चौपाटीवर कोणत्याही बांधकामासाठी समितीची परवानगी आवश्यक असल्याने, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्तांनी एमएमआरडीएला या नवीन जागेबाबतचा प्रस्ताव पालिकेकडे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

​मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाद्वारे (MMRDA) राबवला जाणारा हा प्रकल्प अतिशय महत्वाचा आहे. दक्षिण मुंबईची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी गेमचेंजर म्हणून या प्रकल्पाकडे पाहीले जात आहे. पूर्व मुक्त मार्ग (Eastern Freeway), अटल सेतू आणि मरीन ड्राईव्हसह कोस्टल रोडला जोडणारा हा मार्ग आहे. हा मार्ग जवळपास  9.2 ते 10 किलोमीटर लांबीचा असणार आहे. यातील  7 किलोमीटरचा भाग पूर्णपणे भूमिगत असे अशी माहिती देण्यात आली आहे. सध्या ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह या प्रवासासाठी जवळपास अर्धा ते पाऊण तास लागतो. मात्र हा बोगदा मार्ग सुरू झाल्यास हा प्रवास अवघ्या पाचच मिनिटात होणार आहे. 

नक्की वाचा - Pune News: कृषिमंत्री दत्ता भरणेंकडून शेतकऱ्यांची थट्टा? बळीराजाच्या जखमेवर मीठ चोळणारे वक्तव्य, Video Viral

​या प्रकल्पात दोन स्वतंत्र बोगदे बांधले जाणार आहे. त्याची सुरूवात ही झाली आहे. त्यात बहुपदरी मार्ग, आपत्कालीन यंत्रणा आणि अत्याधुनिक सुरक्षा व्यवस्था असेल असं ही सांगितलं जात आहे. या प्रकल्पामुळे केवळ वेळेचीच नाही तर मोठ्या प्रमाणावर इंधनाची बचत होणार असल्याचं ही स्पष्ट आहे. त्यामुळेच या प्रकल्पाकडे गेमचेंजर म्हणून पाहीला जात आहे. तांत्रिक इमारतीच्या जागेचा तिढा सुटल्यानंतर प्रकल्पाच्या कामाचा वेग आणखी वाढणार आहे. बास्केटबॉल मैदानाच्या जागेची पडताळणी करून एमएमआरडीए लवकरच हा प्रस्ताव पालिकेला आणि त्यानंतर मुंबई शहर जिल्हाधिकाऱ्यांना सादर करणार आहे. त्यानंतर या कामाला आणखी वेग येईल असं सांगितले जात आहे. 

नक्की वाचा - Bhiwandi News: सहाय्यक आयुक्तालाच लाच घेताना रंगेहात पकडले, लाचेची रक्कम पाहून डोळे होतील पांढरे

हा बोगदा मार्ग मुंबईकरांना खूप फायद्याचा आहे. वेळ आणि इंधन बचत तर होणारच आहे पण सुरक्षित प्रवासाची हमी ही याद्वारे मिळणार आहे. मुंबईत सध्या वेगवेगळे प्रकल्प सुरू आहेत. तर काही प्रकल्प हे मार्ग लागले आहे. एकीकडे कोस्टल रोड, अटल सेतू, मेट्रोचे जाळे, या सर्वां सोबत आता हे भुयारी मार्ग ही मुंबईकरांच्या सेवेत लवकरच येणार आहे. याभागत असलेली वाहतूक कोंडी पाहाता हा भूयारी मार्ग नोकरदारांसाठी नवसंजिवनी ठरणार असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com