जाहिरात

Bhiwandi News: सहाय्यक आयुक्तालाच लाच घेताना रंगेहात पकडले, लाचेची रक्कम पाहून डोळे होतील पांढरे

या कर्मचाऱ्यांची नियुक्ती जबाबदारीच्या पदावर करू नये असे निर्देश आहेत. पण ते पाळले जातात का हा खरा प्रश्न आहे.

Bhiwandi News: सहाय्यक आयुक्तालाच लाच घेताना रंगेहात पकडले, लाचेची रक्कम पाहून डोळे होतील पांढरे
  • भिवंडी महापालिकेतील सहाय्यक आयुक्त सुरेंद्र भोईर यांनी अनधिकृत बांधकामासाठी पाच लाख रुपयांची लाच मागितली होती
  • सहाय्यक आयुक्तांनी तक्रारदाराकडे तात्काळ दोन लाख पन्नास हजार रुपयांचा पहिला हप्ता देण्याचा आग्रह धरला होता
  • ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अडीच लाख रुपयांची लाच घेताना सुरेंद्र भोईर यांना रंगेहाथ पकडले
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
भिवंडी:

भूपेंद्र आंबवणे 

सरकारी काम आणि दहा महीने थांब ही म्हण सर्वांच्याच परिचयाची आहे. पण आता दहा महीने थांबण्या पेक्षा झटपट काम हवं असेल तर खिसा गरम करावा लागतो. हे अनेक सरकारी कार्यालयात पाहायला भेटते. अगदी चिरीमिरी पासून ते मोठ मोठ्या डिल केल्या जातात. शिपाया पासून ते मोठ्या अधिकाऱ्यापर्यंत अनेक जण आता पर्यंत लाच घेताना जाळ्यात अडकले आहेत. अशीच एक घटना भिवंडी महापालिकेच घडली आहे. इथं चक्क सहाय्यक आयुक्तानेच लाच घेतली आहे. या लाचेची रक्कम पाहीली तर तुमचे डोळे फिरल्या शिवाय राहाणार नाहीत. त्यामुळे भिवंडी महापालिका आहे की भ्रष्टाचाराचे केंद्र असा प्रश्न पडल्या शिवाय राहात नाही.  

भिवंडी महानगरपालिका भ्रष्टाचारासाठी नेहमीच चर्चेत राहिली आहे. मंगळवारी ते पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. महापालिकेचे 
प्रभारी सहाय्यक आयुक्त म्हणून सुरेंद्र भोईर हे काम पाहत आहेत. त्यांची नियुक्ती सर्वेअर तथा इमारत निरीक्षक म्हणून जबाबदारी होती. प्रभाग समिती क्रमांक तीनमध्ये अनधिकृत बांधकाम सुरू होते. त्यावर कारवाई न करण्यासाठी त्यांनी  पाच लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यामधील पहिला हप्ता  दोन लाख पन्नास हजार रुपयांचा तात्काळ द्यावा असं त्यांनी संबंधीत तक्रारदाराला सांगितलं होतं. मात्र याबाबत तक्रारदाराने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागात धाव घेतली. शिवाय त्यांच्याकडे याबाबत तक्रार दिली.

नक्की वाचा - Pune News: मंदीर, मस्जिद जमिनदोस्त, आता बुद्ध विहार अन् चर्च ही रडारवर, अनधिकृत बांधकामांवर थेट कारवाई

लाच मागितल्याची खातरजमा केल्यानंतर ठाणे पथकाने सापळा रचला. मंगळवारी सायंकाळी सात वाजता प्रभाग समिती कार्यालया बाहेर मोकळ्या मैदानात सहाय्यक आयुक्त सुरेंद्र भोईर होता. तो स्वत:च्या हुंडाई क्रेटा कारमध्ये बसला होता. त्यावेळी तक्रारदार तिथे पोहचला. त्याने सांगितल्या प्रमाणे अडीच लाख रूपये तो घेवून आला होता. तो त्यांच्या कार जवळ पोहोचला. त्यानंतर त्यांच्या जवळ असलेले अडीच लाख रूपये त्यांनी सहाय्यक आयुक्त सुरेंद्र भोईर यांना दिले. त्याच वेळी लाचेची ही अडीच लाख रुपयांची रक्कम स्वीकारताना त्यांनी लाचलुचपत पथकाने रंगेहाथ पकडले.

नक्की वाचा - Fact Check: तुमच्या खिशातील 100, 200, 500 रुपयांच्या नोटा बंद होणार? 30 जूनच्या तारखेचं RBI नं सांगितलं सत्य

या कारवाईनंतर सुरेंद्र भोईर याची शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत चौकशी करण्यात आली. त्याचा जबाब नोंदवण्यात आला. त्यानंतर पहाटे अटक केली गेली. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या या कारवाईमुळे पालिका वर्तुळात खळबळ माजली आहे. मागील तीन वर्षाच्या कार्यकाळात पालिका कार्यालयात लाच लुचपत विभागाच्या चार कारवायांमध्ये सात कर्मचाऱ्यांना अटक झाली होती.परंतु अशा कारवाया नंतर या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई होणे आवश्यक आहे. या कर्मचाऱ्यांची नियुक्ती जबाबदारीच्या पदावर करू नये असे निर्देश असतानाही अशा कर्मचाऱ्यांवर प्रशासनाकडून मेहरबानी ठेवली जात असल्याने अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com