Mumbai Metro : मुंबईतील मेट्रो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मेट्रो मार्गिका 7 (गुंदवली – ओवरीपाडा) आणि मेट्रो मार्गिका 9 (पहिला टप्पा – दहिसर पूर्व ते काशीगाव) यांच्या एकत्रीकरणाचे (System Integration) आणि सुरक्षा चाचण्यांचे (Safety Trials) काम हाती घेण्यात येत आहे. यामुळे 12 ते 18 ऑक्टोबर 2025 या 7 दिवसांच्या कालावधीसाठी मेट्रो मार्गिका २ए (दहिसर पूर्व – डी.एन. नगर) आणि मेट्रो मार्गिका 7 वरील मेट्रो सेवांच्या वेळेत तात्पुरता बदल करण्यात आला आहे. यानुसार, या मार्गांवर सकाळची पहिली मेट्रो सेवा नेहमीपेक्षा थोडी उशिरा सुरू होईल.
हा बदल 'लाल मार्गिका विस्तार' (Red Line Extension) प्रकल्पातील एक महत्त्वाचा टप्पा असून, अंधेरी (पूर्व) ते मिरा-भाईंदर दरम्यान भविष्यात अखंडित आणि सुसंगत प्रवासासाठी तो अत्यावश्यक आहे. सध्या मेट्रो मार्गिका 7 वर 13 स्थानकांदरम्यान सेवा सुरू आहे, तर मार्गिका 7 ची विस्तारित मार्गिका 9 चे काम अंतिम टप्प्यात आहे.
सुधारित मेट्रो वेळापत्रक (12 ते 18 ऑक्टोबर 2025)
डहाणूकरवाडीहून
अ)गुंदवली कडे पहिली मेट्रो
१)सोमवार ते शुक्रवार – सकाळी 07:01 वाजता
२)शनिवार – सकाळी 07:00 वाजता
३) रविवार – सकाळी 07:04 वाजता
ब)अंधेरी पश्चिमकडे पहिली मेट्रो
१)सोमवार ते शुक्रवार – सकाळी 07:06 वाजता
२)शनिवार – सकाळी 06:58 वाजता
३)रविवार – सकाळी 06:59 वाजता
( नक्की वाचा : Mumbai Metro 3 Aqua Line: कशी आहे मुंबईतील पहिली भूमिगत मेट्रो? वाचा मुंबई मेट्रो 3 चा संपूर्ण मार्ग आणि तिकीट दर )
दहिसर पूर्वहून
अ)अंधेरी पश्चिमकडे पहिली मेट्रो:
१)सोमवार ते शुक्रवार – सकाळी 06:58 वाजता
२)शनिवार – सकाळी 07:02 वाजता
३)रविवार – सकाळी 07:02 वाजता
ब )गुंदवलीकडे पहिली मेट्रो:
१)सोमवार ते शुक्रवार – सकाळी 06:58 वाजता
२)शनिवार – सकाळी 07:06 वाजता
३) रविवार – सकाळी 07:01 वाजता
अंधेरी पश्चिमहून
अ)गुंदवलीकडे पहिली मेट्रो:
१)सोमवार ते शुक्रवार – सकाळी 07:01 वाजता
२)शनिवार – सकाळी 07:02 वाजता
३)रविवार – सकाळी 07:04 वाजता
गुंदवलीहून पहिली मेट्रो
अ) अंधेरी पश्चिमकडे पहिली मेट्रो:
१)सोमवार ते शुक्रवार – सकाळी 07:06, वाजता
२)शनिवार – सकाळी 07:02 वाजता
३)रविवार – सकाळी 07:00 वाजता
( नक्की वाचा : Mumbai Metro 3: मुंबईची Aqua Line च्या स्टेशन्सचा First Look; वाचा खास वैशिष्ट्ये )
प्रवाशांना आवाहन
महा मुंबई मेट्रोने सर्व प्रवाशांना आवाहन केले आहे की, त्यांनी या कालावधीत आपल्या प्रवासाचे नियोजन करताना, MumbaiOne (मुंबई वन) ॲप, महा मुंबई मेट्रोचे अधिकृत सोशल मीडिया हँडल्स आणि स्थानकांवरील माहिती फलक यांवर उपलब्ध असलेले अद्ययावत वेळापत्रक तपासावे.
प्रणाली एकत्रीकरण आणि सुरक्षा चाचण्यांमुळे लवकरच गुंदवली ते मिरा गाव दरम्यान थेट, सुसंगत आणि अखंड मेट्रो सेवा उपलब्ध होईल, ज्यामुळे पश्चिम उपनगरांतील प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर होणार आहे. महा मुंबई मेट्रोने या कामात सहकार्य केल्याबद्दल सर्व प्रवाशांचे आभार व्यक्त केले आहेत.