Raksha Bandhan 2025 : लाडके भाऊ 7 तास रेल्वे स्थानकावर; रक्षाबंधनासाठी सोडणारी विशेष ट्रेन लेट

Raksha Bandhan 2025 : मुंबई नागपूर विशेष ट्रेन सहा ते सात तास उलटल्यानंतर आल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Mumbai to Nagpur Raksha Bandhan Special Train : आज भाऊ-बहिणांच्या नात्यातील सर्वात खास सण आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने भाऊ-बहिणींकडून राखी बांधून घ्यायला जात असतात. तर काही ठिकाणी बहिणी राखी बांधण्यासाठी भावाकडे येत असतात. सर्वसाधारणपणे दरवर्षी या दिवशी मोठ्या वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागतं. रस्ते मार्गाबाबत सांगायचं झालं तर शहरात आणि एक्स्प्रेसवे दोन्ही ठिकाणी मोठी गर्दी होते. त्यामुळे भावा-बहिणींचा वेळ एकमेकांसोबत जाण्याऐवजी ट्रॅफिकमध्ये जातो. याची दखल घेत रेल्वे प्रशासनाकडून मुंबई-नागपूर विशेष ट्रेन सेवा सुरू केली आहे. (Raksha Bandhan 2025)

मात्र ही विशेष ट्रेन तब्बल 7 तास उशीरा आल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. त्यामुळे मुंबईहून नागपूरला जाणाऱ्या भावा-बहिणींना आज रक्षाबंधनाचा अधिकांश वेळ ट्रेनमध्ये घालवावा लागणार आहे. 8 ऑगस्टच्या मध्यरात्री 12 वाजता ही ट्रेन सीएसएमटी स्थानकावरुन सुटणार होती. मात्र ही ट्रेन तब्बल सात तास उशीराने म्हणजे सात वाजता सीएसएमटी स्थानकातून सुटली. 

नक्की वाचा - Raksha Bandhan 2025 : रक्षाबंधनाच्या निमित्तानं सायबर फसवणुकीत वाढ, डोळ्यासमोर अकाऊंटमधून पैसे गायब! वाचा बचाव करण्याचे उपाय


    मुंबई नागपूर विशेष ट्रेन तब्बल सात तास उशीराने...
    मुंबई नागपूर विशेष ट्रेन सहा ते सात तास उलटल्यानंतर आल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला. संतप्त प्रवाशांनी रेल्वे स्थानकात राडा घातला. मध्यरात्री 12 वाजता येणारी विशेष ट्रेन सहा तास उलटले तरी आली नव्हती. रेल्वे प्रशासनाचा चालकाशी संपर्कच होत नसल्याचं कारण अधिकाऱ्यांनी दिले आहे. यानंतर अधिकाऱ्यांना प्रवाशांना घेराव घातला. यानंतर सहा वाजता निघणारी गीतांजली एक्सप्रेस जाऊ देणार नाही असा पवित्रा प्रवाशांनी घेतला. यानंतर आज सकाळी 7 वाजता ही ट्रेन सोडण्यात आली. 

    Advertisement