Mumbai News : मुंबईतील प्रसिद्ध स्वीट्सच्या दुकानात काजू कतलीमध्ये भयंकर आढळलं; स्वयंपाकघराचं दृश्य पाहून...

खाद्यपदार्थ तयार करताना आणि पॅकिंग करताना आवश्यक ती काळजी घेतली जाते का, याबाबतही शंका व्यक्त केली जात आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

ऋतिक गणकवार, प्रतिनिधी

Mumbai News : मुंबईतील ओपेरा हाऊस परिसरातील तिवारी स्वीट्समधून खरेदी केलेल्या काजू कतलीमध्ये गंजलेली धातूची पिन आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे अन्नसुरक्षेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

काजू कतलीमध्ये गंजलेली पिन...

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ग्राहकाने २९ जुलै २०२६ रोजी मोतीचूर लाडू आणि काजू कतली खरेदी केली होती. घरी मिठाई खात असताना काजू कतलीच्या एका तुकड्यात गंजलेली धातूची पिन आढळली. विशेष म्हणजे ही मिठाई त्यांच्या तीन वर्षांच्या मुलीला खाऊ घालण्यापूर्वीच पिन नजरेस पडल्याने मोठा अनर्थ टळल्याचा दावा ग्राहकाने केला आहे. या प्रकारानंतर ग्राहकाने संताप व्यक्त करत मिठाईच्या दर्जाबाबत आणि उत्पादन प्रक्रियेतील निष्काळजीपणाबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. खाद्यपदार्थ तयार करताना आणि पॅकिंग करताना आवश्यक ती काळजी घेतली जाते का, याबाबतही शंका व्यक्त केली जात आहे.

Advertisement

या घटनेमुळे अन्न स्वच्छता, गुणवत्ता नियंत्रण आणि ग्राहकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. संबंधित प्रकरणाची अन्न व औषध प्रशासनाकडून चौकशी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून दोषी आढळल्यास संबंधितांवर कारवाईची मागणी होत आहे. दरम्यान या प्रकरणाबाबत संबंधित मिठाई विक्रेत्याची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. 

तिवारी स्वीट्समधील स्वयंपाकघराची भयंकर अवस्था...

या ग्राहकाने तिवारी स्वीट्समधील एक व्हिडिओ शूट केला आहे. हे स्वयंपाकघर अत्यंत अस्वस्थ अवस्थेत असल्याचं दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे या स्वयंपाकघरातच टॉयलेटदेखील आहे. स्वयंपाकघर अत्यंत अस्वस्थ आहे. तेथील एका गॅसवर पायपुसणीसदृश्य कापड कढईत उकळताना ठेवल्याचं दिसत आहे. हे स्वयंपाकघर पाहून ग्राहकाने संताप व्यक्त केला आहे. 


Topics mentioned in this article