Mumbai News : 'मुंबई' करते मालामाल, देशातील एकमेव शहर; अहवालातून मोठी माहिती समोर

मुंबईने श्रीमंतीच्या बाबतीत पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Mumbai News : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई देशातील तब्बल ३५ टक्के गर्भश्रीमंत लोक राहत असल्याचं समोर आलं आहे. नाइट फ्रँक या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या वेल्थ रिपोर्ट २०२६ मधून पुढे आलं आहे. या वाढीमुळे जागतिक स्तरावर गर्भश्रीमंतांच्या संख्येत भारत चक्क सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे.

मुंबईने श्रीमंतीच्या बाबतीत पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. भारतातील एकूण 'अतिश्रीमंत' व्यक्तींपैकी तब्बल ३५ टक्के लोक एकट्या मुंबईत वास्तव्यास आहेत, असं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. या अहवालामुळे जागतिक स्तरावर अतिश्रीमंतांच्या संख्येबाबत भारत आता सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे.

Advertisement

नक्की वाचा - Zombie Drugs : झॉम्बी ड्रग्जचं धक्कादायक सत्य उघड; तरुणाने नेमकं काय खाल्लं? ठाणे पोलिसांचा मोठा खुलासा

अहवालात काय म्हटलंय?

ज्या व्यक्तींची संपत्ती २५० कोटी रुपयांहून अधिक आहे. त्यांना या श्रेणीत स्थान देण्यात आलं आहे. अहवालानुसार, भारतातील एकाच शहरात इतक्या मोठ्या प्रमाणात श्रीमंत व्यक्ती असण्याचे मुंबई हे एकमेव उदाहरण ठरलं आहे. गेल्या पाच वर्षांत भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनात सुमारे ३८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. याच काळात देशात संपत्ती निर्मितीलाही मोठा वेग मिळाला असून त्यामागे अनेक क्षेत्रं महत्त्वाची ठरली आहेत.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा विस्तार, शेअर बाजार, औद्योगिक गुंतवणूक यामुळे नव्या उद्योजकांची संख्या वाढली आणि श्रीमंत अतिश्रीमंत झाले आहेत. श्रीमंतांच्या या वाढत्या संख्येचा सर्वाधिक फायदा मुंबईच्या रिअल इस्टेट क्षेत्राला झाला आहे. मुंबईत आलिशान घरांची मागणी वाढली असून, मोठ्या घरांच्या खरेदी-विक्रीत मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. यामुळे बांधकाम उद्योगाला मोठी चालना मिळाली आहे.

Topics mentioned in this article