जाहिरात

Mumbai News: निवडणुकीचे अतिरिक्त काम करायला शिक्षकांचा विरोध, शिक्षक आक्रमक

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेकडून या सूचनांना थेट विरोध करण्यात आलेला आहे.

Mumbai News: निवडणुकीचे अतिरिक्त काम करायला शिक्षकांचा विरोध, शिक्षक आक्रमक
मुंबई:

विशाल पाटील 

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय पक्षांची तयारी जोरदार सुरू आहे. त्यासोबत मुंबई महापालिका प्रशासनाकडून सुद्धा आता कामाला सुरुवात झालेली आहे. मुंबई महानगरपालिकेने येणाऱ्या निवडणुकीच्या कामाच्या जबाबदारीचे वाटप शिक्षकांना केले आहे. शिक्षकांनी कशा पद्धतीने निवडणुकीचे काम केलं, पाहिजेत याबाबतीत  सूचना जारी करण्यात आल्या आहेत. मात्र या सूचनांना आणि शिक्षकांना देण्यात आलेल्या अतिरिक्त कामाला शिक्षक संघटनांचा विरोध होऊ लागला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेकडून या सूचनांना थेट विरोध करण्यात आलेला आहे. शिक्षकांना अतिरिक्त काम देत आहात हे काम करणं शिक्षकांना जमत नाही. याची अनेक कारणे आहेत. यामध्ये प्रामुख्याने मुंबईत शिकवायला येणारे शिक्षक हे मुंबईच्या बाहेरचे आहेत. त्यामुळे अनेकांना एक ते दोन तासाचा प्रवास करावा लागतो. यामुळे शिक्षकांना हे अतिरिक्त काम करणं अवघड आहे. या अतिरिक्त कामाचा ताण हा शिक्षकांच्या मानसिकतेवर होऊ शकतो. याचा परिणाम थेट विद्यार्थ्यांवर होणार आहे, असं संघटनेचं मत आहे.  

ट्रेंडिग बातमी - Crime News: 50 वर्षाचा शिक्षक, 17 वर्षांची विद्यार्थीनी, 1 वर्षापासून अत्याचार अन् शेवटी...

जो शिक्षक मानसिक तणावाखाली आहे, तो विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने शिकवू शकतो याचा विचार करावा असा प्रश्न महाराष्ट्र राज्य परिषद शिक्षक संघटनेच्या मुंबई शिक्षक कार्यवाही शिवनाथ दराडे यांनी केला आहे. निवडणुकीच्या अतिरिक्त कामाला आमचा विरोध असणारच आहे. लवकरच मुंबईतील सर्व शिक्षक यांच्या बाबतीत बैठक घेऊन आंदोलनाची दिशा ठरवू शकतात अशा पद्धतीचा इशारा सुद्धा शिवनाथ दराडे यांनी दिला आहे. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणूकीचे काम कोण करणार असा प्रश्न आता मुंबई महापालिका प्रशासना समोर असणार आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com