Mumbai News : मुंबईतील LPG गॅस सिलिंडर ग्राहकांना अलर्ट करणारी बातमी, कांदिवलीत घडली धक्कादायक घटना

कांदिवली पश्चिम येथील काकाजी केणी चौक परिसरात पार्क केलेल्या टेम्पोतून 27 गॅस सिलिंडर चोरी झाल्याच्या प्रकरणाचा चारकोप पोलिसांनी उलगडा केला आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Mumbai LPG Gas Cylinder Robbery
मुंबई:

Mumbai GAS Cylinder Robbery News : मागील काही दिवसांपासून देशभरात एलपीजी गॅस सिलिंडरचा तुटवडा असल्याने काही ठिकाणी लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कमर्शियल सिलेंडरच्या किंमती वाढल्याने, तसच गॅस सिलिंडरचा काळा बाजारही सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. अशातच आता मुंबईच्या कांदिवलीत 27 गॅस सिलिंडर चोरी प्रकरण उघडकीस आलं आहे.  कांदिवली पश्चिम येथील काकाजी केणी चौक परिसरात पार्क केलेल्या टेम्पोतून 27 गॅस सिलिंडर चोरी झाल्याच्या प्रकरणाचा चारकोप पोलिसांनी उलगडा केला आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. या कारवाईत सुमारे ६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

टेम्पोतून एचपी कंपनीचे  27 गॅस सिलेंडर लांबवले 

या प्रकरणी तक्रारदार नंदकुमार रामराज सोनी (35) यांनी चारकोप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. 25 मार्च 2026 रोजी रात्री 11 ते 26 मार्च रोजी सकाळी 8  दरम्यान काकाजी केणी चौक येथे उभ्या असलेल्या टेम्पोतून एचपी कंपनीचे एकूण 27 गॅस सिलेंडर चोरीस गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते. त्यानुसार चारकोप पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

Advertisement

नक्की वाचा >> Beed News : "मी एकटा पडलो..", मित्रांनी बर्थडे पार्टीला बोलावलं नाही, तरुणाने स्टेटस ठेऊन भयंकर पाऊल उचललं

तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपीचा शोध

तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला.तपासात वापरण्यात आलेला टेम्पो महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचा व्हिरो मॉडेल (क्रमांक MH48 DQ 0021)असल्याचे समोर आले.त्यानंतर पोलिसांनी पालघर जिल्ह्यातील नालासोपारा येथून 32 वर्षीय आरोपीला ताब्यात घेतले.आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेला टेम्पो तसेच चोरीस गेलेल्या 27 पैकी 12 गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले असून जप्त मुद्देमालाची किंमत जवळपास 6 लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.