VIDEO : गुडी पाडवा शोभायात्रेत चमकोगिरी नडली; पोलिसांनी तरुणीची शायनिंग गर्दीसमोरच जिरवली!

Viral Video: बाईकवर बसलेली तरुणी नऊवारी साडी नेसून पारंपरिक वेशात शोभा यात्रेत सहभागी झाली होती. मात्र तिने स्पोर्ट्स बाईकवर बसून केलेल्या हुल्लडबाजीमुळे तिच्या सर्व मेहनतीवर पाणी फेरलं असंच म्हणावं लागेल.

जाहिरात
Read Time: 2 mins

Mumbai Viral VIDEO: मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यावर जेव्हा एखादी सुपरबाईक धावते, तेव्हा सर्वांच्या नजरा आपोआप तिकडे वळतात. मात्र, हाच 'स्वॅग' एका रायडरला महागात पडला आहे. मुंबईत गुडी पाडव्यानिमित्त निघालेल्या शोभा यात्रेत सायलेन्सरचा कानठळ्या बसवणारा आवाजमुळे मुंबई पोलिसांनी चमकोगिरी करणाऱ्या तरुणीला चांगलंच झापलं. या सर्व घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नक्की काय घडले?

मुंबईतील गुडी पाडव्यानिमित्तच्या शोभा यात्रेत एक तरुणी पॉवरफुल सुपरबाईकचे इंजिन वारंवार 'रेव्ह' (Revving) करत होता. आजूबाजूला असलेल्या गर्दीचा कोणताही विचार न करता ही तरुणी शायनिंग मारण्यात मग्न होती. सायलेन्सरच्या मोठ्या आवाजामुळे उपस्थितांनाही त्रास होत होता. यावेळी तिथे कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्याने तत्परता दाखवत या तरुणीला गर्दी समोरच झाप झापलं. 

Advertisement

पाहा VIDEO

(नक्की वाचा-  Ashok Kharat: कॅप्टन' खरातची चिंधीगिरी! कोट्यवधींची माया पण गरीब शेतकऱ्याला फसवलं; खळबळजनक आरोप)

बाईकवर बसलेली तरुणी नऊवारी साडी नेसून पारंपरिक वेशात शोभा यात्रेत सहभागी झाली होती. मात्र तिने स्पोर्ट्स बाईकवर बसून केलेल्या हुल्लडबाजीमुळे तिच्या सर्व मेहनतीवर पाणी फेरलं असंच म्हणावं लागेल. कारण संपूर्ण गर्दीच्या नजरा तिच्यावर खिळल्या मात्र नको त्या कारणासाठी. तरुणीलाही आपल्या चुकीची लगेचच जाणीव झाल्याचं या व्हिडीओतून दिसत आहे. कारण महिला पोलीस अधिकाऱ्यांना ओरडा भरल्यानंतर तरुणीदेखील तातडीने बाईकवरून खाली उतरली.   

महिला अधिकाऱ्यांना कर्तव्य संबंधित बाईक मालक तरुणाला देखील जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र काही तरुणांनी तिथे हुज्जत घालण्याच्या प्रयत्न केला. मात्र स्थानिकांनी मध्यस्थी करत प्रकरण तिथेच मिटवले. काही वेळानंतर ही परिस्थिती शांत झाली. मात्र सोशल मीडियावर हा व्हिडीओ आता तुफान व्हायरल होत आहे. 
 

Topics mentioned in this article