मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी पत्रकारांना एक व्हिडीओ दाखवला. हा व्हिडी अतिशय धक्कादायक होता. शिवाजी पार्क इथं विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू होते. त्या आंदोलनाला काही विद्यार्थी चालले होते. त्यांना एका पोलीस अधिकाऱ्याने थेट धमकी दिली. दर आंदोलनात जाल तर तुमच्या खिशात 50 ग्रॅम पावडर ठेवेन. तुम्हाला कायमचं अडकवेन. तुम्हाला जामीन ही मिळणार नाही. अशा शब्दात त्यांने या तरुणांना धमकावले. शिवाय तिथून त्यांना पिटाळून लावले. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. दरम्यान ही धमकी ज्या तरुणाला देण्यात आली तो आता माध्यमा समोर आला आहे. त्याने त्यावेळी नक्की काय घडलं हेच सर्वां समोर मांडले आहे.
त्या तरुणाचे नाव हर्षवर्धन कदम आहे. शिवाजी पार्कवर हजारो विद्यार्थी एकवटले होते. दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेला लाठीहल्ला आणि नीट प्रकरणी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीमाना द्यावा यासाठी ते शिवाजी पार्कात निषेध नोंदवण्यासाठी आले होते. यात सहभागी होण्यासाठी हर्षवर्धन ही शिवाजी पार्कच्या दिशेने चालला होता. त्यावेळी त्याला पोलिसाने अडवले. या विद्यार्थ्यांना ताब्यात ही घेतले. त्यांना पोलीस व्हॅनमध्ये बसवण्यात आले. त्यावेळी तो पोलीस अधिकारी हर्षवर्धन आणि त्याच्या सहकाऱ्यांना धकमी देत होता. मोठ्या चालाखीने हर्षवर्धनने त्या अधिकाऱ्याचा व्हिडीओ तयार केला.
हर्षवर्धनने सांगितलं की, मी दादरमध्ये आंदोलन करण्यासाठी गेलो. त्यावेळी आंदोलनाचे काही व्हिडीओ मी काढत होतो. त्याच वेळी पोलिसांनी मला हटकले. त्यानंतर त्यांनी मला ताब्यात ही घेतले. त्यानंतर माझ्या सोबत काही विद्यार्थ्यांना ताब्यात घेवून पोलिस व्हॅनमध्ये टाकण्यात आले. त्यावेळी व्हॅनमध्ये असलेल्या पोलीसाने आम्हाला धमकी दिली. तो म्हणाला तुमच्या खिशात पन्नास पन्नास ग्रॅम पावडर टाकेन. तुम्हाला जेलमध्ये टाकू अशी धमकी देण्यात आली असं हर्षवर्धन याने सांगितले. पुढे जावून आम्हाला सोडण्यात आलं. मग आम्ही पुन्हा त्या रॅलीमध्ये गेलो असं ही त्याने स्पष्ट केलं.
हर्षवर्धन हा बारावी पास आहे. तो सायन्सचा विद्यार्थी आहे. ज्यावेळी राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली त्यात त्यांनी हा व्हिडीओ दाखवला होता. त्यानंतर सुत्र हलली. हीबाब मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत ही गेली. संबंधीत पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई ही करण्यात आली आहे. पण आंदोलन कशा पद्धतीने मोडीत काढली जात आहेत? त्यासाठी कोणत्या गोष्टी केल्या जात आहेत? याची चर्चा मात्र या निमित्ताने होत आहे. एकीकडे आंदोलकांमध्ये फुटीरवादी असल्याचं सांगितलं जात आहे. तर दुसरीकडे पोलिस अशा पद्धतीने आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहेत हे आता या व्हिडीओच्या निमित्ताने स्पष्ट झाल्याचं बोललं जात आहे.