सूरज कसबे, प्रतिनिधी
Mumbai-Pune Traffic Update : संपूर्ण राज्यभरात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे.मुंबई,पुणे,रायगड,ठाणे,रत्नागिरीसह नाशिकमध्येही पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. नद्यांना पूर आल्याने अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे.त्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागत आहे.अशातच मुंबई आणि पुणे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याची माहिती समोर आली आहे. मिसिंग लिंकवर दरड कोसळली आहे.अतिवृष्टीमुळे पुण्याकडे आणि मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णतः ठप्प आहे.नव्यानं खुला करण्यात आलेल्या मिसिंग लिंकवर दरड कोसळलेली आहे.सध्या ही दरड आणि मलबा जेसीबी,पोकलेन मशिनच्या सहाय्याने सुरू आहे.
पुणे ते मुंबई लेन पूर्णपणे बंद
आज दुपारी घडलेल्या घटनांची माहिती संबंधीत सर्व यंत्रणांना देण्यात आली आहे.पावसामुळे दर्शनी भागात असलेला बीम कोसळला. त्यानंतर आता तो बाजूला करण्याचं काम सुरू आहे. पुढील दोन तीन तासांत काम पूर्ण करून वाहतुकीचे नियोजन करून वाहतुकीस खुला करण्यात येणार आहे. तर भविष्यात अशी घटना होऊ नये म्हणून पुढील काळात उपाययोजना करण्यात येणार आहे.
नक्की वाचा >> Flood Video : उल्हास नदीने ओलांडली धोक्याची पातळी, दहिवली पुलावरून पाणी, कर्जतमध्ये अनेक गावांचा संपर्क तुटला
अन्य रस्त्यावरील वाहतूक पूर्ववत
आयआयटी बॉम्बेची टीम सुद्धा बोलाविणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी स्पष्ट केले आहे. आम्ही मिसिंग लिंक मधील पुणे ते मुंबई लेन पूर्णपणे बंद ठेवली.अन्य रस्त्यावरील वाहतूक पूर्ववत होत आहे.अजूनही ही काम सुरू आहे. काम पूर्ण झाल्यानंतर सर्व सुरळीत असल्याची खात्री करून मिसिंग लिंक सुरू करण्यात येणार आहे,अशी माहिती राज्यमार्गाते पोलीस अधीक्षक शिवाजी पवार यांनी दिली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world