Mumbai-Pune Expressway: 'मिसिंग लिंक'मुळे वेळ-अंतर वाचणार; टोल देखील अधिकचा द्यावा लागणार?

Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील 13.3 किमीचा 'मिसिंग लिंक' प्रकल्प पूर्णत्वाकडे असून, 1 मेपासून तो प्रवाशांसाठी खुला होण्याची शक्यता आहे. यामुळे प्रवासाचा वेळ 25-30 मिनिटांनी वाचणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

मुंबई आणि पुणे या दोन्ही शहरांना जोडणाऱ्या यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील बहुप्रतिक्षित 'मिसिंग लिंक' प्रकल्पाचे काम आता शेवटच्या टप्प्यात आले आहे. केवळ एका डेक सेक्शनचे काम शिल्लक असून, 1 मे 2026 (महाराष्ट्र दिन) पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य प्रशासनाने ठेवले आहे. या नवीन मार्गामुळे प्रवाशांचा प्रवास केवळ वेगवानच होणार नाही, तर तो अधिक सुरक्षितही होणार आहे.

घाट विभागातील धोकादायक वळणांना 'बायपास'

सध्या लोणावळा ते खंडाळा दरम्यानचा 19.8 किमीचा मार्ग अत्यंत वळणदार आणि चढ-उताराचा आहे. नवीन 'मिसिंग लिंक'मुळे हा प्रवास केवळ 13.3 किमीचा होईल. नवीन मार्ग हा घाट सेक्शनमधील तीव्र वळणे आणि अपघातप्रवण क्षेत्र टाळणार आहे. यामुळे चालकांना चांगली व्हिजिबिलिटी मिळेल आणि अपघातांचे प्रमाण कमी होईल. या प्रकल्पामुळे मुंबई-पुणे दरम्यानचे अंतर सुमारे 6 किमीने कमी होईल आणि प्रवाशांचे 25 ते 30 मिनिटे* वाचतील.

(नक्की वाचा-  Bhandara News: घरात आईचे पार्थिव, डोळ्यांत अश्रू... पण मुलाने स्वत:ला सावरत दिला बोर्डाचा पेपर)

टोल दराबाबत दिलासा

प्रवास वेगवान होणार असल्याने टोल वाढणार का? अशी भीती नागरिकांमध्ये होती. मात्र, अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, टोलमध्ये कोणतीही अचानक किंवा मोठी वाढ केली जाणार नाही. त्याऐवजी, टोल वसुलीचा कालावधी 2045 पर्यंत वाढवण्यात आला आहे. टोल दरांचा पुढील आढावा 2030 मध्ये घेतला जाईल.

(नक्की वाचा-  Chhatrapati Sambhajinagar: "दोन दिवसांत बघतो...", दारुड्याची भररस्त्यात पोलिसांना मारहाण, पाहा VIDEO)

वाहतुकीचा ताण आणि सुरक्षिततेची मागणी

सध्या या महामार्गावरून दररोज 75 हजार वाहने धावतात, तर सुट्ट्यांच्या दिवशी ही संख्या 1.20 लाखांपर्यंत पोहोचते. मात्र अलीकडील अपघातांमुळे या मार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला होता.
 

Advertisement
Topics mentioned in this article