Mumbai Rains Today: मुंबई पुढील 3 तास मुसळधार पावसाचा अंदाज, BMC ने शेअर केला हेल्पलाईन नंबर

Mumbai Rain Alert : आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी किंवा अधिकृत माहितीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षाच्या 1916 या मदतसेवा क्रमांकावर संपर्क साधावा, असं आवाहन मुंबई महानगरपालिकेने केलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Mumbai News : मुंबईत अनेक ठिकाणी पहाटेपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबई उपनगरात देखीळ जोरदार पाऊस सुरू आहे. आज मुंबईत दिवसभर असाच पाऊस असण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.  दुपारी  3.23  वाजता समुद्राला मोठी भरती येण्याची शक्यता आहे. यावेळी 4.31 मी पर्यंत लाटा उसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे समुद्र किनाऱ्यांवर न जाण्याचे आवाहन प्रशासनानेक केले आहे. 

मुंबई महानगरपालिकाने ट्वीट करत सांगितलं की, भारतीय हवामान खात्याकडून मुंबई महानगरात (मुंबई शहर आणि उपनगरे) पुढील 3 तासांसाठी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी किंवा अधिकृत माहितीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षाच्या 1916 या मदतसेवा क्रमांकावर संपर्क साधावा.

(Rain Update : मुंबईसह उपनगरात आजही पावसाची रिपरिप, कोकणातील एका जिल्ह्यात अतिवृष्टी; विदर्भातील स्थिती काय आहे?)

(नक्की वाचा - Mumbai News : खड्ड्यांच्या तक्रारी अ‍ॅप आणि व्हॉट्सअ‍ॅपवर करता येणार; BMC चं स्मार्ट पाऊल)

मुंबईत अनेक ठिकाणी पावसाची बॅटिंग

मुंबईत आज पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. मुंबई उपनगर सुद्धा जोरदार पाऊस असून परिणामी मुंबईत ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे. आज मुंबईत दिवसभर असाच पाऊस असण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. मागील 24 तासात मुबई शहरात 95 मिमी पावसाची नोंद झाली आहे. पूर्व उपनगरात 58 मिमी पावसाचा नोंद झाली आहे. तर पश्चिम उपनगरात 75 मिमी पावसाची नोंद झाली आहे. 

Topics mentioned in this article