28 उमेदवार रिंगणात, मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या 10 नोंदणीकृत पदवीधरांच्या जागांकरिता आज निवडणूक

मुंबई विद्यापीठाच्या 10 नोंदणीकृत पदवीधारकांच्या जागांकरिता आज 24 सप्टेंबर 2024 रोजी मतदान पार पडणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

मुंबई विद्यापीठाच्या 10 नोंदणीकृत पदवीधरकांच्या जागांकरिता आज 24 सप्टेंबर 2024 रोजी मतदान पार पडणार आहे. 10 जागांवरील निवडणुकीसाठी एकूण 28 उमेदवार असून या निवडणूकीसाठी एकूण 13,406 मतदार आहेत. मुंबई विद्यापीठ परिक्षेत्रातील एकूण 38 मतदान केंद्रावर आणि 54 बुथवर ही निवडणूक पार पडणार आहे. सकाळी 9 ते 5 मतदानाची वेळ आहे.

विद्यापीठाच्या https://mu.eduapp.co.in या संकेतस्थळावर केंद्रनिहाय आणि बुथनिहाय मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली असून मतदार त्यांच्या नावाने आणि मोबाईल फोन क्रमांकाच्या आधारे त्यांचे मतदार यादीतील नाव, मतदान केंद्र आणि बुथ क्रमांक पाहू शकतील. विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने या निवडणुकीसाठी आवश्यक ती सर्व तयारी करण्यात आली आहे. 38 केंद्र आणि 64 बुथसाठी आवश्यक कर्मचारी आणि निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. 27 सप्टेंबर 2024 रोजी या निवडणूकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. 

नक्की वाचा -   मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी आता नवी तारीख, हायकोर्टाकडून विनंती मान्य

विद्यापीठानं दिली होती स्थगिती

यापूर्वी मुंबई विद्यापीठाच्या 10 जागांसाठी होणारी सिनेट निवडणूक रविवारी (22 सप्टेंबर) रोजी नियोजित होती. पण, शुक्रवारी रात्री अचानक विद्यापीठानं परिपत्रक काढत ही निवडणूक स्थगित केली. या निर्णयाला युवा सेनेकडून मुंबई हायकोर्टात आव्हान देण्यात आलं होतं. त्यावर सुनावणी करताना हायकोर्टानं विद्यापीठानं दिलेली स्थगिती रद्द केली.

मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक अखिल भारतीय विद्यार्थी परिषद उमेदवारांची नावे
हर्षद भिडे 
प्रतीक नाईक 
रोहन ठाकरे 
प्रेषित जयवंत 
जयेश शेखावत 
राजेंद्र सायगावकर 
निशा सावरा 
राकेश भुजबळ 
अजिंक्य जाधव 
रेणुका ठाकूर

Advertisement

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक युवा सेनेच्या उमेदवारांची नावे  
प्रदीप सावंत
मिलिंद साटम
परम यादव
अल्पेश भोईर
किसन सावंत
स्नेहा गवळी
शीतल शेठ   
मयूर पांचाळ  
धनराज कोहचडे 
शशिकांत झोरे