जाहिरात

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी आता नवी तारीख, हायकोर्टाकडून विनंती मान्य

Mumbai University Senate Election : मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुकीची नवी तारीख हायकोर्टानं जाहीर केली आहे.

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी आता नवी तारीख, हायकोर्टाकडून विनंती मान्य
मुंबई:

Mumbai University Senate Election : मुंबई विद्यापीठाच्या सिनेटची निवडणूक रविवारच्या ऐवजी मंगळवारी (24 सप्टेंबर) रोजी होणार आहे. यापूर्वी ही निवडणूक नियोजित वेळापत्रकानुसार म्हणजेच रविवारी घेण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं दिले होते. त्यानंतर ही निवडणूक मंगळवारी घेण्याची विनंती मुंबई विद्यापीठानं केली. ती विनंती हायकोर्टानं मान्य केली आहे. सिनेट निवडणुकीची मतमोजणी 27 तारखेला होणार आहे.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

न्यायाधीश ए एस चांदूरकर यांनी मुंबई विद्यापीठाच्या लेखी उत्तरानंतर विनंती मान्य केली. सिनेट निवडणुकांसंदर्भात विद्यापीठाच्या वतीनं लेखी स्वरुपात प्रतिज्ञापत्र देण्यात आलं. त्यामध्ये या निवडणुका उद्या (रविवार) ऐवजी मंगळवारी घेण्यात येतील, असं स्पष्ट करण्यात आलं. 

विद्यापीठानं दिली होती स्थगिती

यापूर्वी मुंबई विद्यापीठाच्या 10 जागांसाठी होणारी सिनेट निवडणूक रविवारी (22 सप्टेंबर) रोजी नियोजित होती. पण, शुक्रवारी रात्री अचानक विद्यापीठानं परिपत्रक काढत ही निवडणूक स्थगित केली. या निर्णयाला युवा सेनेकडून मुंबई हायकोर्टात आव्हान देण्यात आलं होतं. त्यावर सुनावणी करताना हायकोर्टानं विद्यापीठानं दिलेली स्थगिती रद्द केली. 

Mumbai University Senate Election : हायकोर्टाचा मुंबई विद्यापीठाला दणका, निवडणुकीबाबतचा आदेश रद्द
 

युवा सेनेकडून आभार

आम्ही उच्च न्यायालयाचे खूप खूप आभार मानू इच्छितो. हा विजय केवळ युवासेनेचा नसून 13500 पदवीधरांचा आहे. सरकारनं लोकशाहीविरोधात रचलेलं षडयंत्र उच्च न्यायालयानं हाणून पाडलं, त्याबद्दल उच्च न्यायालयाचे आभार मानतो, अशी प्रतिक्रिया युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी व्यक्त केली. युवा सेना या निवडणुकीसाठी सज्ज आहे. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्त्वामध्ये आम्ही सर्व 10 जागा जिंकू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

सिनेट निवडणुकीत ठाकरे यांची युवा सेना विरुद्ध अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ( Yuva Sena vs ABVP) यांच्यात मुख्य सामना होणार आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com