Mumbai News: मुंबईकरांनो काही दिवस पाणी उकळून प्या आणि जपून वापरा! BMC चं नागरिकांना आवाहन

Mumbai News: अप्पर वैतरणा जलवाहिनी ही मुंबईला पाणीपुरवठा करणारी मुख्य वाहिनी आहे. मेट्रोच्या कामात अडथळा ठरणारी ही वाहिनी वळवण्यासाठी क्रॉस-कनेक्शन करणे आवश्यक आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

मुंबईतील मेट्रो 7A च्या प्रकल्पाचा मार्ग मोकळा करण्यासाठी के-पूर्व प्रभागात 2400 मिमी व्यासाच्या अप्पर वैतरणा जलवाहिनीच्या क्रॉस-कनेक्शनचे काम पालिकेकडून केले जाणार आहे. हे काम मंगळवार, 20 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजल्यापासून गुरुवार, 22 जानेवारी रोजी पहाटे 5 वाजेपर्यंत चालणार आहे. या 44 तासांच्या मोठ्या कामामुळे मुंबईतील महत्त्वाच्या उपनगरांचा पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे.

पाणी कपातीचा परिणाम होणारे मुख्य विभाग

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, या देखभालीच्या कामामुळे दादर-माहीम, जोगेश्वरी-अंधेरी, भांडुप, वांद्रे (पूर्व) आणि घाटकोपर या भागांतील पाणीपुरवठ्यावर परिणाम होईल. काही ठिकाणी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद असेल, तर काही ठिकाणी कमी दाबाने किंवा बदललेल्या वेळेत पाणी येईल. 

44 तासांचे काम

अप्पर वैतरणा जलवाहिनी ही मुंबईला पाणीपुरवठा करणारी मुख्य वाहिनी आहे. मेट्रोच्या कामात अडथळा ठरणारी ही वाहिनी वळवण्यासाठी क्रॉस-कनेक्शन करणे आवश्यक आहे. पालिकेने एन, के-पूर्व, एच-पूर्व आणि एस प्रभागांतील नागरिकांना पाणी साठवून ठेवण्याचे आणि उकळून पिण्याचे आवाहन केले आहे.

(नक्की वाचा- Shefali Jariwala Death: "शेफालीवर कुणीतरी काळी जादू केली होती!" पती पराग त्यागीचा खळबळजनक दावा)

पाणीपुरवठा विस्कळीत होणारी ठिकाणे

लोअर डेपो पाडा, सागर नगर
20 जानेवारी ते 21 जानेवारी (दुपारी 1 ते 5.30) 

विक्रोळी पश्चिम रेल्वे स्टेशन, फिरोजशहा नगर, गोदरेज कंपाऊंड  
20 जानेवारी ते 21 जानेवारी (दुपारी 1 ते रात्री 10.30)

कैलास संकुल, मेफेअर बिल्डिंग
20 जानेवारी ते 21 जानेवारी (दुपारी 12.30 ते 2)

आर सिटी मॉल, कल्पतरू संकुल, दमयंत पार्क, श्रेयस सिनेमा, साईनाथ नगर, नित्यानंद नगर
20 जानेवारी ते 21 जानेवारी (संध्याकाळी 5.30 ते रात्री 10.30) 

Advertisement

पालिकेचे नागरिकांना आवाहन

  • पाणीपुरवठा बंद होण्यापूर्वी पुरेसा पाणीसाठा करून ठेवावा.
  • पाणी कपातीनंतर पुढील काही दिवस पाणी गाळून किंवा उकळून प्यावे.
  • देखभालीच्या कामात पालिकेला सहकार्य करावे, जेणेकरून वेळेत काम पूर्ण होईल.
     
Topics mentioned in this article