जाहिरात

Mumbai Lakes : राज्यात धो-धो, पण मुंबईतील धरणसाठ्याला पावसाची प्रतीक्षा! वाचा सर्व आकडेवारी

Mumbai lake levels : गेल्या 24 तासांत, मुंबईला पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या सात तलावांच्या पाणलोट क्षेत्रात केवळ 1 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

Mumbai Lakes : राज्यात धो-धो, पण मुंबईतील धरणसाठ्याला पावसाची प्रतीक्षा! वाचा सर्व आकडेवारी
Mumbai lake levels : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणसाठ्यांना मात्र दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. 
मुंबई:

राज्यातील अनेक भागात मे महिन्यापासूनच पावसाला सुरुवात झाली. मोसमी पाऊस देखील देशात लवकर आला. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या क्षेत्रात पावसानं दमदार हजेरी लावली. विशेष म्हणजे यामधील दुष्काळासाठी प्रसिद्ध असलेल्या भागातही आत्तापर्यंत दमदार पाऊस झाला आहे. पण, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणसाठ्यांना मात्र दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

गेल्या 24 तासांत, मुंबईला पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या सात तलावांच्या पाणलोट क्षेत्रात केवळ 1 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. हा सर्व पाऊस फक्त तानसा तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झाला आहे. इतर कोणत्याही तलावाच्या परिसरात पाऊस झालेला नाही.

यामुळे मुंबईतील तलावांमधील पाणीसाठा आणखी कमी झाला असून, तो आता 10.07 टक्के म्हणजेच 1,45,713 दशलक्ष लिटर इतका आहे. पूर्ण क्षमतेने भरल्यावर हे तलाव 14,47,363 दशलक्ष लिटर पाणी साठवू शकतात.

(नक्की वाचा : Mumbai Local Train Accident : .... तर मुंब्रातील अपघात टळला असता, 'त्या' तक्रारीकडील दुर्लक्ष भोवलं? )

मुंबईला तानसा, मोडक सागर, विहार, तुलसीस अप्पर वैतारणा, भातसा आणि मध्य वैतरणा या सात धरणामधून पाणीपुरवठा होतो. या सर्व धरणांमध्ये किती पाणीपुरवठा शिल्लक आहे ते पाहूया

मोडक सागर - 361012
तानसा - 15422
विहार - 9123
तुलसी - 2375
अप्पर वैतरणा - 1696
भातसा - 54500
मध्य वैतरणा - 26585

( सर्व धरणातील पाणीसाठा हा दशलक्ष लीटर्समध्ये उपलब्ध आहे. ही सर्व आकडेवारी ही 10 जून 2026 पर्यंतची आहे.) 


मात्र, मुंबई महापालिकेनं (BMC) सध्या काळजीचं कारण नाही, असं स्पष्ट केलं आहे.  कारण पावसाळ्याची नुकतीच सुरुवात झाली आहे. गेल्या वर्षी याच दिवशी तलावांमध्ये केवळ 5.81 टक्के पाणी म्हणजेच 84,155 दशलक्ष लिटर पाणीसाठा होता, असं पालिकेनं स्पष्ट केलं आहे. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com