जाहिरात

Palghar News : मुंबई–अहमदाबाद महामार्गावर 40 किमीपर्यंत मोठी वाहतूक कोंडी, हजारो प्रवासी अडकले, कारण काय?

गुजरातमधील मुसळधार पावसाने आता मुंबई–अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाची जीवनवाहिनीच ठप्प केली आहे.भिलाड परिसरात महामार्ग पाण्याखाली गेल्याने वाहनांच्या तब्बल 35 ते 40 किलोमीटर लांब रांगा लागल्या आहेत.

Palghar News : मुंबई–अहमदाबाद महामार्गावर 40 किमीपर्यंत मोठी वाहतूक कोंडी, हजारो प्रवासी अडकले, कारण काय?
Mumbai- Ahmedabad Highway Traffic

Mumbai-Ahmedabad Traffic Jam : गुजरातमधील मुसळधार पावसाने आता मुंबई–अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाची जीवनवाहिनीच ठप्प केली आहे.भिलाड परिसरात महामार्ग पाण्याखाली गेल्याने वाहनांच्या तब्बल 35 ते 40 किलोमीटर लांब रांगा लागल्या आहेत.महाराष्ट्राच्या तलासरी सीमेपर्यंत वाहतूक कोंडी पसरली असून हजारो प्रवासी अनेक तासांपासून महामार्गावर अडकून पडले आहेत. 

दक्षिण गुजरातमधील वापी,भिलाड आणि वलसाड परिसरात गेल्या अनेक तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. भिलाडजवळ मुंबई–अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील अनेक सखल भाग आणि पूल पाण्याखाली गेल्याने महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. करंबेली,कोलवाडा पूल परिसर तसेच भिलाड अंडरपासमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनांची पुढील वाटचाल अशक्य झाली आहे.

नक्की वाचा >> Badlapur News : बदलापूर, वांगणी परिसराला वादळी वाऱ्याचा फटका! दोन दिवसांपासून बत्ती गुल, काही शाळांना सुट्टी

बससह हजारो वाहने महामार्गावर अडकली

या परिस्थितीचा फटका थेट महाराष्ट्रालाही बसला आहे.भिलाडपासून पालघर जिल्ह्यातील धुंदलवाडीपर्यंत,तसेच तलासरी–दापचेरी मार्गावर तब्बल 35 ते 40 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.कंटेनर,ट्रक,खासगी वाहने आणि प्रवासी बससह हजारो वाहने महामार्गावर अडकली असून अनेक वाहनचालक तीन ते चार तासांहून अधिक काळ वाहतूक कोंडीत अडकून पडले आहेत.

नक्की वाचा >> Ahilyanagar News: सावधान! अहिल्यानगरच्या 'या' ठिकाणी पिसळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ, एकाचा मृत्यू, 15 जण जखमी

अत्यावश्यक कामाशिवाय या मार्गावर प्रवास टाळावा

मुसळधार पावसामुळे दक्षिण गुजरातमधील अनेक गावांतील रस्ते,अंडरपास आणि सखल भाग जलमय झाले असून स्थानिक प्रशासनाने काही ठिकाणी वाहतुकीवर निर्बंध घातले आहेत.परिस्थिती लक्षात घेता नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय या मार्गावर प्रवास टाळावा, तसेच पर्यायी मार्गांचा वापर करावा,असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, प्रशासनाकडून पाणी उपसण्याचे आणि वाहतूक सुरळीत करण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.मात्र पावसाचा जोर कायम असल्याने वाहतूक पूर्ववत होण्यासाठी आणखी काही काळ लागू शकतो.

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com