Mumbai Water Crises Update : उन्हाळा सुरु झाला की राज्यातील अनेक भागात पाणी टंचाई सुरु होते. हे वर्ष देखील त्याला अपवाद नाही. यंदाही राज्यातील दुष्काळी भागातील नागरिकांना पाण्यासाठी फिरावं लागत आहे. पण राज्याची राजधानी असलेल्या मुंबईलाही गेल्या काही दिवसांपासून पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. देशाची आर्थिक राजधानी आणि जागतिक व्यापाराचं मोठं केंद्र असलेल्या मुंबईवर सध्या पाणी टंचाईचं दुहेरी संकट ओढवलं आहे. हे दुहेरी संकट काय आहे हे जाणून घेऊया
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मुंबईत पाणीबाणी का?
मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पाण्याचा अभाव आहे. त्याचवेळी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वॉटर टँकर अससोसिएशनचा संप सलग तिसऱ्या दिवशी सुरु आहे. केंद्राने ज्या अटी घातल्या आहेत त्याचं पालन करणे अशक्य आहे. त्यामध्ये बदल करावा अशी टँकर असोसिएशनची मागणी आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः सोशल मीडिया नेटवर्क 'एक्स' वर पोस्ट करत मुंबई महापालिकेला तातडीने तोडगा काढण्याचे आदेश दिले. त्यानंतर मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी पाठवलेल्या नोटीसला 15 जूनपर्यंत स्थगिती दिली आहे.
या स्थगितीनंतरही टँकर असोसिएशन ऐकायला तयार नाही. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्या मार्फत पत्रकार परिषदेमध्ये नवीन नियम रद्द करण्याची घोषणा केली केली पाहिजे, अशी मागणी या असोसिएशनचे अध्यक्ष जसबीर सिंग बिरा यांनी केलीय.