
Mumbai Water Crises Update : उन्हाळा सुरु झाला की राज्यातील अनेक भागात पाणी टंचाई सुरु होते. हे वर्ष देखील त्याला अपवाद नाही. यंदाही राज्यातील दुष्काळी भागातील नागरिकांना पाण्यासाठी फिरावं लागत आहे. पण राज्याची राजधानी असलेल्या मुंबईलाही गेल्या काही दिवसांपासून पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. देशाची आर्थिक राजधानी आणि जागतिक व्यापाराचं मोठं केंद्र असलेल्या मुंबईवर सध्या पाणी टंचाईचं दुहेरी संकट ओढवलं आहे. हे दुहेरी संकट काय आहे हे जाणून घेऊया
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मुंबईत पाणीबाणी का?
मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पाण्याचा अभाव आहे. त्याचवेळी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वॉटर टँकर अससोसिएशनचा संप सलग तिसऱ्या दिवशी सुरु आहे. केंद्राने ज्या अटी घातल्या आहेत त्याचं पालन करणे अशक्य आहे. त्यामध्ये बदल करावा अशी टँकर असोसिएशनची मागणी आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः सोशल मीडिया नेटवर्क 'एक्स' वर पोस्ट करत मुंबई महापालिकेला तातडीने तोडगा काढण्याचे आदेश दिले. त्यानंतर मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी पाठवलेल्या नोटीसला 15 जूनपर्यंत स्थगिती दिली आहे.
मुंबईतील टँकरचालकांचा संप सुरु असल्याने काही भागात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. उन्हाळ्याचा काळ पाहता ही स्थिती अशीच राहणे योग्य नाही. त्यामुळे बदललेले नियम आणि टँकरचालकांच्या मागण्या यातून सुवर्णमध्य साधत, सामान्य जनतेला त्रास होणार नाही, यादृष्टीने तातडीने तोडगा काढावा,…
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 11, 2025
या स्थगितीनंतरही टँकर असोसिएशन ऐकायला तयार नाही. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्या मार्फत पत्रकार परिषदेमध्ये नवीन नियम रद्द करण्याची घोषणा केली केली पाहिजे, अशी मागणी या असोसिएशनचे अध्यक्ष जसबीर सिंग बिरा यांनी केलीय.
( नक्की वाचा : मुंबईतील वाहतूक कोंडी सुटणार, या दुहेरी बोगद्याचं काम लवकरच होणार सुरू )
उबाठा विरुद्ध मनसे
टँकर असोसिएशन आणि प्रशासन यांच्यात बोलणी सुरु असतानाच या प्रश्नाचं राजकारण देखील सुरु आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनीही या प्रश्नावर टँकर अससोसिएशनला पाठींबा दिला आहे. हा प्रश्न लवकरात लवकर सोडवला नाही तर मोर्चा काढण्याचा इशारा ठाकरेंनी दिलाय.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मात्र टँकर असोसिएशनच्या विरोधात भूमिका मांडलीय.. वॉटर टँकर चालक कसे आणि कुठेही वाहनं उभे करतात.... मनमानी कारभार सुरु असल्याचा आरोप मनसे शहर अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी केला आहे.
मुंबईवर हे दुहेरी पाणी संकट ओढवलं असताना तोडगा मात्र निघालेला नाही पण राजकारण मात्र सुरु झालं आहे.. मुंबईकरांना आता आपल्या हक्काचं पाणी कधी मिळणार याचीच प्रतीक्षा आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world