Mumbai News : नवीन वर्षात मुंबईकरांचे पाणी महागणार?, BMC आयुक्तांकडे प्रस्ताव

Mumbai Water Bill : पाणीपट्टी वाढीच्या बाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. मात्र 2012 पासून दरवर्षी 8 टक्के पाणीपट्टी वाढ होत असते.

जाहिरात
Read Time: 1 min

महागाईची झळ सोसणाऱ्या सर्वसामन्य नागरिकांना आणखी एक झटक बसण्याची शक्यता आहे. नवीन वर्षात मुंबईकरांचे पाणी महागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबई महापालिका आयुक्तांकडे तसा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.  

मुंबई महापालिकेने गेल्या 2 वर्षात पाणीपट्टीत वाढ केलेली नाही. त्यामुळे 8 टक्के पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव आयुक्तांकडे पाठवण्यात आला आहे.  मोडक सागर , मध्य वैतरणा , अप्पर वैतरणा , भातसा , तानसा , विहार आणि तुळशी या धरणातून मुंबईला रोज 3950 दशलक्ष पाणीपुरवठा केला जातो. 

पाणीपट्टी वाढीच्या बाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. मात्र 2012 पासून दरवर्षी 8 टक्के पाणीपट्टी वाढ होत असते. मात्र मागील 2 वर्षांपासून कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. निवडणुका जवळ असल्याने हा निर्णय देखील रद्द होऊ शकतो. 

Topics mentioned in this article