जाहिरात

Mumbai Rain: मुंबईकरांनो, छत्र्या बाहेर काढा! 'या' दिवसापासून कोसळणार पावसाच्या सरी, वाचा लेटेस्ट अपडेट

Mumbai Rain: उकाड्यामुळे हैराण झालेल्या मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी  आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या मुंबईत अखेर वरुणराजाचे आगमन होणार आहे.

Mumbai Rain: मुंबईकरांनो, छत्र्या बाहेर काढा! 'या' दिवसापासून कोसळणार पावसाच्या सरी, वाचा लेटेस्ट अपडेट
Mumbai Rain: बईकरांना आता घराबाहेर पडताना सोबत छत्री ठेवावी लागेल. (फाईल फोटो)
मुंबई:

Mumbai Rain: उकाड्यामुळे हैराण झालेल्या मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी  आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या मुंबईत अखेर वरुणराजाचे आगमन होणार असून येत्या शुक्रवारी मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांना आता घराबाहेर पडताना सोबत छत्री ठेवावी लागेल.

शुक्रवारपासून मुंबईत पावसाची हजेरी

हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, मुंबई आणि आसपासच्या परिसरात या शुक्रवारपासून मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात होऊ शकते. दक्षिण कोकणात गेल्या 48 ते 72 तासांपासून पावसाने आधीच हजेरी लावली आहे. हा पाऊस आता उत्तरेकडे सरकत असून या आठवड्याच्या अखेरीस तो मुंबईत धडकण्याची चिन्हे आहेत.

दक्षिण कोकणात पावसाचे आगमन

कोकण किनारपट्टीवर पावसाचे वातावरण तयार झाले असून दक्षिण कोकणातील अनेक भागात गेल्या 2 ते 3 दिवसांपासून मान्सूनपूर्व पाऊस पडत आहे. हाच बदलता हवामानाचा पट्टा आता उत्तर कोकण आणि मुंबईच्या दिशेने सरकत असल्यामुळे मुंबईकरांनाही उकाड्यापासून मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

मान्सून यंदा लवकर धडकणार

यंदा मान्सूनचे आगमन वेळेपूर्वीच होण्याची शक्यता हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे. केरळमध्ये 26 मे पर्यंत मान्सून पोहोचू शकतो, जो नेहमीच्या 1 जून या तारखेपेक्षा एक आठवडा आधी आहे. मान्सूनचा पुढील प्रवास असाच राहिला, तर महाराष्ट्रात 2 जून आणि मुंबईत 5 जून रोजी अधिकृत मान्सून दाखल होऊ शकतो. मुंबईत मान्सून पोहोचण्याची सर्वसाधारण तारीख 11 जून असते.

( नक्की वाचा : Monsoon 2026: पावसाच्या वाटेत 'व्हिलन'ची एन्ट्री! शेतकरी ते सर्वसामान्य सर्वांचीच चिंता वाढली, वाचा सर्व अपडेट )

गेल्या 10 वर्षांतील पावसाचा कल

मुंबईत गेल्या काही वर्षांत पावसाच्या आगमनाच्या तारखांमध्ये मोठी तफावत पाहायला मिळाली आहे. गेल्या वर्षी मुंबईत 26 मे रोजी मान्सूनचे सर्वात लवकर आगमन झाले होते, जे गेल्या 75 वर्षांतील विक्रमी लवकर आगमन होते. त्याउलट 2023 मध्ये बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सून 25 जूनला पोहोचला होता, जे आतापर्यंतचे सर्वात उशिरा झालेले आगमन होते. 2022 मध्ये तो 11 जूनला, तर 2021 आणि 2020 मध्ये अनुक्रमे 9 जून आणि 14 जून रोजी दाखल झाला होता.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com