Thane News: MIM नगरसेविका सहर शेख आणि युनूस शेख एकनाथ शिंदेंना भेटणार, तो VIDEO झाला होता व्हायरल

सहर शेख यांनी आपल्या भाषणात मुंब्रा पूर्णपणे 'हिरवे' (एमआयएममय) करण्याचे विधान केले होते. यावरून भाजपने आणि हिंदू संघटनांनी त्यांच्यावर जातीय तेढ निर्माण केल्याचा आरोप केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

रिजवान शेख, ठाणे

नुकत्याच झालेल्या ठाणे महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग 30 मधून विजय मिळवलेल्या सहर युनूस शेख सध्या त्यांच्या एका विधानामुळे चर्चेत आहेत. विजयानंतरच्या मिरवणुकीत त्यांनी *"पुढच्या 5 वर्षांत संपूर्ण मुंब्रा हिरवं करू"* असे विधान केले होते, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. हा मुद्दा तापलेला असताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहर शेख आणि त्यांचे वडील युनूस शेख यांना भेटीला बोलावलं आहे.

किरीट सोमय्या यांची तक्रार

सहर शेख यांनी आपल्या भाषणात मुंब्रा पूर्णपणे 'हिरवे' (एमआयएममय) करण्याचे विधान केले होते. यावरून भाजपने आणि हिंदू संघटनांनी त्यांच्यावर जातीय तेढ निर्माण केल्याचा आरोप केला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात धाव घेऊन सहर शेख यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

(नक्की वाचा- Solapur News: भाजपला रोखण्यासाठी शिंदे आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र; दोन्ही राष्ट्रवादीही सोबत)

सहर शेख यांनी मात्र यावर स्पष्टीकरण देताना म्हटले की, "माझ्या पक्षाचा झेंडा हिरवा आहे, त्यामुळे मी राजकीय संदर्भात ते बोलले होते. जर माझ्या पक्षाचा झेंडा भगवा असता, तर मी भगवं करू असं म्हटलं असतं."

उपमुख्यमंत्री शिंदेंनी का बोलावले?

कालच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहर शेख यांच्या व्हिडिओवरून कडक शब्दांत समाचार घेतला होता. "राज्यात कोणत्याही प्रकारची जातीय तेढ खपवून घेतली जाणार नाही," असा इशारा त्यांनी दिला होता. त्यानंतर आज त्यांनी स्वतः युनूस शेख आणि सहर शेख यांना भेटीसाठी बोलावले आहे.

Advertisement

(नक्की वाचा-  Rain Alert: महाराष्ट्रावर अवकाळीचे संकट! 26 जानेवारीपर्यंत 7 जिल्ह्यांत पावसाचा इशारा; शेतकरी चिंतेत)

या भेटीनंतर मुंब्र्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ सहर शेख यांना त्यांच्या विधानाबद्दल कडक समज देतात की या भेटीतून काही वेगळा राजकीय मार्ग निघतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. युनूस शेख हे यापूर्वी जितेंद्र आव्हाड यांचे निकटवर्तीय होते. त्यांच्या या भेटीमुळे मुंब्रा-कळवा भागातील राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) वर्चस्वाला धक्का बसू शकतो.
 

Topics mentioned in this article