Marathi Municipal School Closed : मराठी भाषा कशी वाचणार? गेल्या 13 वर्षात 131 मराठी शाळांना लागलं कुलूप

मराठी भाषा वाचवायची असेल तर मराठी शाळा टिकल्या पाहिजेत असं अनेक तज्ज्ञांचं म्हणणं आहे. मात्र प्रत्यक्षात मराठी शाळांची सद्याची परिस्थिती चिंता वाढवणारी आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

मराठी भाषेला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. एकीकडे मराठीचा उदोउदो केला जात असताना दुसरीकडे तिला वाचविण्यासाठी धडपड करावी लागत आहे. मराठी भाषा वाचवायची असेल तर मराठी शाळा टिकल्या पाहिजेत असं अनेक तज्ज्ञांचं म्हणणं आहे. मात्र प्रत्यक्षात मराठी शाळांची सद्याची परिस्थिती चिंता वाढवणारी आहे. 

गेल्या 13 वर्षांत महापालिकेच्या तब्बल 131 मराठी शाळा बंद (Marathi municipal school Closed) झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. याशिवाय मराठी शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये 45 टक्के घट झाली असून शाळेतील शिक्षकांची संख्याही कमी होत असल्याचं चित्र आहे. २०२४ - २५ या वर्षी २५४ मराठी शाळा आणि ३६,२०५ विद्यार्थी तर ९२६ शिक्षक कार्यरत आहे. अशीच स्थिती राहिली तर येणाऱ्या काही वर्षात मुंबईत मराठी शाळांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. 

नक्की वाचा - Mumbai Water Metro : स्वस्त दरात मुंबईत 'वॉटर मेट्रो'चा पर्याय, 29 टर्मिनल उभारणार, 10 मार्गांची निवड

सर्व शाळेत मराठी भाषेचा आग्रह आणि धोरण राबवलं जात असताना प्रत्यक्षात मात्र मुंबईत मराठी शाळा बंद होत (Marathi municipal school Closed) असल्याचं दिसून येत आहे. आपल्या पाल्याला मराठी शाळेत शिकवण्याची पालकांची मानसिकता नाही हे आकडेवारी वरून स्पष्ट होत आहे.  

Advertisement

गेल्या पाच वर्षात मराठी शाळांची आणि शिक्षकांची स्थिती

२०१९-२० मराठी शाळांची संख्या - २८३ तर शिक्षक संख्या १७२१ 

२०२०- २१ मराठी शाळांची संख्या - २७९ तर शिक्षक संख्या१५८३ 

२०२१ - २२ मराठी शाळांची संख्या - २७१ तर शिक्षक संख्या १३६७

२०२२-२३ मराठी शाळांची संख्या - २६५ तर शिक्षक संख्या ११४९

२०२३-२४ मराठी शाळांची संख्या - २६२ तर शिक्षक संख्या १०११

२०२४-२५ मराठी शाळांची संख्या - २५४ तर शिक्षक संख्या ९२६