Badlapur News: मोठ्या कारवाईने सर्वांचेच धाबे दणाणले, नगरपालिका अ‍ॅक्शन मोडवर, सगळीकडे एकच चर्चा

गेल्या काही वर्षात बदलापूर शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाली आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
बदलापूर:

अमजद खान 

नगरपालिकांच्या निवडणुका नुकत्याच झाल्या आहेत. नवे राज्यकर्ते आता नगरपालिकेत आहेत. त्यामुळे त्यांना सुरूवातीला कामाचा धडाका लावला आहे. बदलापूर नगरपालिकेत ही आता हीच स्थिती दिसत आहे. बदलापूर हे शहर वाढत आहे. त्यामुळे इथं अनधिकृत बांधकामांचे प्रमाण वाढत चालले आहे. शहराला अनधिकृत बांधकामाचा विळखा बसत चालला आहे. त्यामुळे संपूर्ण शहर विद्रुप होत चाललं आहे. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने आता धडक कारवाईची भूमीका घेतली आहे.     

बदलापूर नगरपालिका प्रशासनानं अनधिकृत बांधकामांविरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे. आज पालिकेमार्फत अंबरनाथ-बदलापूर हायवे तसेच पनवेल हायवे लगतची अनधिकृत बांधकामं जमीनदोस्त करण्यात आली. पुढील आठ ते दहा दिवस ही कारवाई सुरू राहणार आहे. त्यावेळी  शहरातील 400 हून अधिक अनधिकृत बांधकामं हटवण्यात येतील अशी माहिती पालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी दिली आहे. या कारवाईमुळे अनधिकृत बांधकामं करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. 

Advertisement

नक्की वाचा - Mumbai News: थुंकाल तर 250 रुपये दंड, कचरा टाकाल तर 500 रूपये, तर 'या' गोष्टीसाठी थेट 25,000 दंड

गेल्या काही वर्षात बदलापूर शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाली आहेत. यात व्यावसायिक दुकानांचं प्रमाण सर्वाधिक आहे. या बांधकामांबाबत अलीकडेच मुंबई उच्च न्यायालयानं पालिकेला आदेश दिले होते. त्यानुसार नगरपालिका प्रशासनांना ही धडक मोहीम हाती घेतली आहे. नगरपालिकेनं शहरातील 400 हून अधिक अनाधिकृत बांधकामांची यादी तयार केली आहे. पुढील आठ ते दहा दिवसात हे सर्व अनधिकृत बांधकामे हटवण्यात येणार आहेत. त्यामुळे बदलापूरची अनधिकृत बांधकामाच्या विळख्यातून सुटका होईल असं बोललं जात आहे.  

नक्की वाचा - Shocking news: बाप रे! एक मिरची 5,000 रुपयांना! हिरव्या मिरचीचा 'तिखट' कारनामा पाहून पोलीसही हादरले

बदलापूर मधल्या या कारवाईचं नागरिकांनी स्वागत केलं आहे. अनधिकृत बांधकामावर कडक कारवाई केली जाईल असं पालिकेची मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. मात्र आता अनधिकृत बांधकामावर कारवाई केली जाईल. मात्र काही काळानंतर त्याच ठिकाणी अनधिकृत बांधकामं पून्हा उभी राहातात. असं होवू नये अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कारण या अनधिकृत बांधकामांना प्रशासनाचाच आशिर्वाद असतो असं ही बोललं जात आहे. त्यामुळे आता तरी ही बांधकामं थांबतील का हे पाहावं लागेल.