Nagpur News: नागपुरात झालेल्या राड्यानंतर सकाळची स्थिती काय? 80 जणांना घेतलं ताब्यात

नागपुरातील वातावरण आता सामान्य होत आहे. तणावपूर्ण शांतता या भागात दिसून येत आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे घटनास्थळाला भेट देणार आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
नागपूर:

नागपूरात सोमवारी रात्री दोन गटात जोरदार राडा झाला. त्यानंतर मोठा तणावर शहरात दिसून आला. नागपूर शहरातील महाल भागात ही घटना घडली. यावेळी मोठ्या प्रमाणात दगडफेक आणि गाड्यांची फोडतोड करण्यात आली. शिवाय काही गाड्या ही जाळण्यात आल्या. मात्र मंगळवारी सकाळी ही स्थिती निवळली आहे. इथं आता तणावर पूर्ण शांतता आहे. आतापर्यंत या प्रकरणी 80 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. ज्या ठिकाणी हा हिंसाचार झाला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शिवाय शेजारील जिल्ह्यातूनही अतिरीक्त कुमक मागवण्यात आली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

नागपुरातील वातावरण आता सामान्य होत आहे. तणावपूर्ण शांतता या भागात दिसून येत आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे घटनास्थळाला भेट देणार आहेत. सकाळ पासून नागपूरातली वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे. शाळा ही सुरू आहेत. ज्या महाल भागात ही घटना घडली त्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शेजारील जिल्ह्यातून ही पोलीस बोलावण्यात आले आहेत. जवळपास एक हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Nagpur Crisis News: दगड-विटांचा मारा, गाड्यांची जाळपोळ, परिसरात तणाव... नागपूर का पेटलं?

रात्री ज्या ठिकाणी बॅरेकेट्स लावण्यात आले होते ते बाजूला करण्यात आले आहेत. रस्त्यावर दगडांडा खच होता. तो ही हटवण्यात आला आहे. शिवाय ज्या गाड्यांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली होती त्या ही हटवण्यात आल्या आहेत. मोबाईल सर्विलन्स व्हॅनची या संपूर्ण परिसरावर नजर आहे. दरम्यान अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन नागपूर पोलिसांनी केले आहे. शिवाय कोणतेही मेसेज फॉर्रवर्ड करू नयेत अशा सुचना ही करण्यात आल्या आहेत. जे अफवा पसरवतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल असंही सांगण्यात आलं आहे.  

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Nagpur Crisis: नागपुरमध्ये जोरदार राडा! 2 गटात दगडफेक, पोलीस उपायुक्तांकडून कुऱ्हाडीने हल्ला

या राड्यानंतर हल्लेखोरांना शोधण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी सीसीटीव्ही तपासले जात आहेत. आतापर्यंत 80 पेक्षा जास्त लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. जवळपास  ५० पेक्षा जास्त वाहानांचं नुकसान झालं आहे. पाच ते सहा गाड्यांना आगी लावल्या गेल्याची माहिती ही समोर आली आहे. सोमवारी सायंकाळच्या सुमारास शहरातील शिवाजी चौक तसेच महाल परिसरात मोठा राडा झाल्याची घटना घडली. सायंकाळच्या सुमारास बाहेरुन आलेल्या  जमावाने दगडफेक केली तसेच गाड्यांची जाळपोळ केली, ज्यामुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक, महाल परिसर तसेच चित्रा टॉकीज भागामध्ये हा राडा झाला. 

Advertisement