Accident news: मनालीत नागपूरच्या तरूणीचा खतरनाक अपघात, 30 फूट खाली पडली अन्...

नागपूरचे रहिवासी प्रफुल्ल बिजवे हे पत्नी आणि मुलगी त्रिशासोबत उन्हाळी सुट्टीसाठी मनालीला गेले होते.

जाहिरात
Read Time: 2 mins
नागपूर:

नागपूरच्या तरुणीचा मनालीमध्ये फिरायला गेली असता एक खतरनाक अपघात झाला आहे. नागपूरची त्रिशा बिजवे ही झिप लाइन अपघातात गंभीर जखमी झाली आहे. झिप लाइनची केबल तुटल्याने ती सुमारे 30 फूट उंचावरून खाली पडली. या अपघातात तिच्या पायाला अनेक ठिकाणी फ्रॅक्चर झाले आहे. कुटुंबीयांनी याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

नागपूरचे रहिवासी प्रफुल्ल बिजवे हे पत्नी आणि मुलगी त्रिशासोबत उन्हाळी सुट्टीसाठी मनालीला गेले होते. रविवारी, 8 जून रोजी त्रिशा झिप लाइनिंग करत असताना अचानक केबल तुटली.  ती जमिनीवर कोसळली. त्यामुळे तिच्या पायाला गंभीर इजा झाली.  कुटुंबीयांनी आरोप केला आहे की त्या ठिकाणी पुरेशी सुरक्षा व्यवस्था नव्हती. अपघातानंतर कोणतीही तातडीची मदत मिळाली नाही.

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Jalgaon News: पत्नीला कारखाली फरफटत नेत, अंगाची कातडी सोलली, हैवान पतीचा भयंकर 'कार'नाम!

त्यानंतर त्रिशाला तिथून रुग्णालयात हलवण्यात आली. त्रिशावर सुरुवातीला मनाली इथं उपचार करण्यात आले. पण नंतर  चंदीगड येथे उपचार करण्यात आले. तिथे उपचार झाल्यानंतर बिजवे कुटुंबीय हे नागपूरला परतले आहेत. आता तिच्या  नागपूरमधील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आपल्या बरोबर झालेली घटना ही भयंकर होती असं बिजवे कुटुंबीय सांगतात. मात्र तिथे आम्हाला हवी तशी मदत मिळाली नाही असं ही त्यांनी सांगितलं. 


Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world