Nagpur News : देवाला हात जोडला, प्रदक्षिणा मारली अन्...नागपुरात 65 वर्षांच्या चोराचा मंदिरात भलताच कारनामा

Nagpur News: नागपुरात मंदिरांना लक्ष्य करून चोऱ्या करणाऱ्या भामट्यांचा उपद्रव वाढला असून, चक्क देवाच्या गाभाऱ्यातच चोरी करण्याचा प्रकार उघड झाला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Nagpur News:  65 वर्षांचा श्रवण खाकरे नावाचा वृद्ध चोरटा भाविकाच्या वेशात मंदिरात आला.
नागपूर:

Nagpur News:  नागपुरात मंदिरांना लक्ष्य करून चोऱ्या करणाऱ्या भामट्यांचा उपद्रव वाढलाय.  चक्क देवाच्या गाभाऱ्यातच चोरी करण्याचा प्रकार शहरात उघड झाला आहे. विशेष म्हणजे चोरी करण्यापूर्वी देवाला हात जोडायचे, प्रदक्षिणा घालायची आणि गर्दी ओसरताच हातसाफ करायचा, अशी विचित्र पद्धत वापरणारा एक वृद्ध चोरटा कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी तातडीने कारवाई करत काही तासांतच या अट्टल चोराच्या मुसक्या आवळल्या आहेत.

काय आहे प्रकरण?

नागपूरच्या शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लालगंज परिसरात असलेल्या प्रसिद्ध हनुमान मंदिरात ही घटना घडली. सुमारे 65 वर्षांचा श्रवण खाकरे नावाचा वृद्ध चोरटा भाविकाच्या वेशात मंदिरात आला. त्याने सुरुवातीला देवाच्या मूर्तीसमोर नतमस्तक होऊन दर्शन घेतले आणि मंदिराची प्रदक्षिणाही घातली. त्यानंतर मंदिरात उपस्थित असलेली इतर भाविकांची गर्दी कमी होण्याची तो शांतपणे वाट पाहत थांबला.

Advertisement

( नक्की वाचा : Pune News : पुण्यात थेट बंगल्यात घुसला बिबट्या; कुत्र्याला उचलून पळवला, पाहा अंगावर काटा आणणारा प्रकार, VIDEO )

मंदिरात कुणीही नसल्याचे पाहून या चोरट्याने दुर्गा मातेच्या मूर्तीवरील चांदीचा मुकुट आणि मंदिरातील पितळी घंटा पटकन चोरली आणि तेथून पळ काढला. मात्र, देवाला हात जोडण्यापासून ते चोरी करेपर्यंतची त्याची सर्व कृत्ये मंदिरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे रेकॉर्ड झाली होती. मंदिरात चोरी झाल्याचे लक्षात येताच व्यवस्थापनाने त्वरित शांतीनगर पोलिसांना याची माहिती दिली.

काही तासांतच अट्टल चोराला बेड्या

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी मंदिरातील सीसीटीव्ही फुटेजची सखोल तपासणी केली. फुटेजच्या आधारे चोराची ओळख पटवून शांतीनगर पोलिसांनी अवघ्या काही तासांतच श्रवण खाकरे याला बेड्या ठोकल्या. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही चोऱ्यांचे गुन्हे दाखल आहेत. सध्या तो हुडकेश्वर परिसरात राहत होता. आरोपीने नागपूर शहर आणि परिसरात अशा प्रकारे आणखी किती मंदिरांमध्ये चोऱ्या केल्या आहेत, याचा सखोल तपास आता पोलीस करत आहेत.


Topics mentioned in this article