Nagpur News: बिबट्यावर चिमुकल्याने थेट चप्पल फेकून मारली, त्यानंतर पुढील 4 तास अंगावर काटा आणणारा थरार

ही मोहीम राबवताना बिबट्या आणि नागरिक दोघांनाही सुरक्षित ठेवण्याचं आवाहन रेस्क्यू टीमसमोर होतं.

जाहिरात
Read Time: 2 mins
नागपूर:

संजय तिवारी

नागपूर शहरात भांडेवाडी परिसर आहे. सकाळी सातच्या सुमारास इथे लोकांची धावपळ सुरू झाली. कारण सकाळी सकाळी बिबट्या दिसल्याची बातमी पसरली होती. बिबट्याचं बातमी ऐकताच नागरिकांना धडकी भरली. त्यानंतर पोलीस आले. त्या पाठोपाठ वनरक्षक ही पोहोचले. मग काय बघ्यांची ही गर्दी जमली. दाट लोकवस्ती असलेल्या भागातील एका निवासी इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर हा बिबट्या लपून बसला होता. याच घरातील एका मुलाने बिबट्याला पाहिलं होतं. मुलाला बिबट्याची शेपटी दिसली. मग काय त्याने चक्क क्या बिबट्याला चप्पल फेकून मारली. पण काहीच हालचाल झाली नाही.

या मुलाने घरच्यांना बिबट्या शिरल्याचं सांगितलं. बिबट्या दिसल्यानंतर कुटुंबाने तातडीने पोलिसांना माहिती दिली.  पण सुरुवातीला पोलिसांना विश्वासच बसेना. अखेर वारंवार फोन केल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांपाठोपाठ वनविभागाचे कर्मचारीही दाखल झाले. त्यांना तिथे खरोखर बिबट्या असल्याचं दिसलं. मग त्यांची ही धांदल उडाली. मग सुरू झाला बिबट्याला पकडण्याचा थरार. त्यात वन अधिकाऱ्यांनी  बिबट्याला डार्ट मारून बेशुद्ध केलं.

नक्की वाचा - Pune News: भीती अन् दहशत! आता घरातून बाहेर पडणं ही अवघड, कोयता गँगने या वेळी जे काही केलं...

ही मोहीम राबवताना बिबट्या आणि नागरिक दोघांनाही सुरक्षित ठेवण्याचं आवाहन रेस्क्यू टीमसमोर होतं. या बिबट्याला घरातून रेस्कयू करण्यासाठी तब्बल चार तास लागले. अखेर रेस्क्यू टीमने बिबट्याला बेशुद्ध करून ताब्यात घेतलं. बिबट्या पिंजऱ्यात गेल्यानंतर रहिवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. हा बिबट्या जखमी अवस्थेत असल्यामुळे पुढील 15 दिवस त्याच्यावर उपचार केले जाणार आहेत. राज्यात बिबट्या रहिवासी वस्त्यांमध्ये शिरण्याचं प्रमाण वाढलं आहे. नाशिक, अहिल्यानगर आणि पुण्यानंतर आता नागपूरचा नंबर लागला आहे. त्यामुळे भविष्यात या प्रश्नावर ठोस उपाय शोधणं गरजेचं झालं आहे. 

Advertisement

नक्की वाचा - CIDCO ची नवी टाऊनशिप कुठे? एकाच ठिकाणी असेल शाळा, हॉस्पिटल, कॉलेज अन् बरचं काही, जाणून घ्या आतली बातमी

गेल्या काही दिवसात बिबट्याचा धुमाकूळ राज्यातल्या वेगवेगळ्या भागात सुरू आहे. खास करू पुण्याच्या ग्रामिण भागात बिबट्याची मोठी दहशत आहे. राज्य सरकारला ही याची दखल घ्यावी लागली. इथं बिबट्याने तिन जणांचा जीव ही घेतला आहे. या बिबट्यांना आळा घालण्यासाठी उपाय योजना ही आखल्या जात आहे. तरी ही हे बिबटे मानवी वस्तीत बिनधास्त फिरताा दिसत आहेत. पुण्यात ही स्थिती असल्यानं आता नागपूरातही बिबट्या आढळून आला आहे. त्यामुळे जनतेमध्ये भीतीचे वातावरण आहे. 

Advertisement