Crime News : नागपूरचा तरुण बिहारच्या 'ड्रीम गर्ल'च्या जाळ्यात, सेक्सटॉर्शनद्वारे 49 लाखांचा गंडा

बिहार राज्यातील पुर्णिया येथील 20 वर्षीय तरुण  सुंदरकुमार कुंदनकुमार सिंह याला अटक करण्यात आली आहे. आरोपी दहावी नापास असला तरी त्याने सेक्सटॉर्शनच्या माध्यमातून लाखोंची माया जमवली होती.

जाहिरात
Read Time: 2 mins

Nagpur Crime News : आयुष्मान खुरानाच्या 'ड्रीम गर्ल' सिनेमात करमवीर सिंग मधूर आणि मुलीच्या आवाजात चांगलं बोलण्याच्या शैलीद्वारे कॉल सेंटरमध्ये चांगलं करिअर घडवण्याचा प्रयत्न करतो. तीच पद्धत एका भामट्याने सायबर गुन्ह्यासाठी वापरली. मुलीचा आवाज काढू शकण्यात पटाईत असलेल्या बिहारच्या तरुणाने ब्लॅकमेल करत पीडितांना कोट्यवधींचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. अनोख्या सेक्सटॉर्शन प्रकरणात नागपूरच्या तरुणाची 49 लाखांनी फसवणूक करणारी तरुणी नसून तरुण निघाला. फसवणूक करणाऱ्या या व्यक्तीला नागपूर शहर सायबर पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून रोख रक्कम, मोबाइल, कागदपत्र जप्त केली आहेत.

(नक्कीव वाचा-  फेसबुकवर 4 दिवसांची मैत्री, चॅटिंग अन् लॉजवर भेट; मात्र एक हट्ट नडला, विवाहितेची निर्घृण हत्या)

बिहार राज्यातील पुर्णिया येथील 20 वर्षीय तरुण  सुंदरकुमार कुंदनकुमार सिंह याला अटक करण्यात आली आहे. आरोपी दहावी नापास असला तरी त्याने सेक्सटॉर्शनच्या माध्यमातून लाखोंची माया जमवली होती. दहावी नापास झाल्यानंतर आरोपी सुंदरकुमारने सायबर क्राईमकडे वळून नागरिकांची फसवणूक सुरू केली. मुलीचा आवाज काढून तो नागरिकांना गंडा घालत होता.

Advertisement

तो एकटाच नव्हे तर त्याच्या गावातील अनेक तरुण अशाच पद्धतीने सेक्सटॉर्शन व सायबर फसवणूक करून नागरिकांची फसवणूक करत असल्याचे समोर आले आहे. सुंदर कुमारचा काकाही याच पद्धतीचे रॅकेट चालवतो. 

Advertisement

नागपूर शहरातील पीडित युवक नागपूरच्या सिमेंट कंपनीत सुपरवायझर असून त्याच्या वडिलांचे किराणा दुकान आहे. जानेवारी महिन्यात सुंदर कुमार सिंह याने युवतीचा आवाज काढून युवकाच्या मोबाइलवर संपर्क साधला आणि आपण युपीच्या गोरखपूर येथील रहिवासी असून, दिल्ली विद्यापीठात शिकत असल्याचे फिर्यादीला सांगितले. 

Advertisement

(नक्की वाचा-  Badlapur Crime: परप्रांतीयाकडून अल्पवयीन मुलीचे अपहरण, मध्यप्रदेशात जाण्याचा प्लॅन, पोलिसांनी 'अशा' मुसक्या आवळल्या)

आरोपी सुंदरकुमारने पीडित तरुणासोबत चॅटिंग सुरू केली. त्यानंतर त्याने या युवकाला अश्लील फोटो पाठवले. युवकाचेही अश्लील फोटो मागवून घेतले. मात्र, युवकाने आपले अश्लील फोटो पाठवताच आरोपीने त्याला ब्लॅकमेल करणे सुरू केले. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन  युवकाकडून 49 लाख 34 हजार रुपये उकळले. त्यानंतरही पैसे मागितल्याने य॒वकाने सोनेगाव पोलिसात तक्रार दिली आणि सुंदर कुमारचे बिंग फुटले. नागपूर पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

Topics mentioned in this article