नाशिक-गुजरात महामार्ग 48 तासांपासून बंद; आदिवासींचा बेमुदत उपोषणाचा इशारा, आंदोलन चिघळणार?

 नाशिक शहरातील गुजरातला जाणारे संपूर्ण राज्य महामार्ग आदिवासी बांधवांनी बंद केले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
नाशिक:

17 संवर्ग पेसा अंतर्गत भरती करून नियुक्ती पत्र द्यावे यासाठी गेल्या 23 दिवसापासून नाशिकच्या ईदगाह मैदानावर आदिवासी उमेदवार उपोषणाला बसलेले आहे. नाशिक शहरातील गुजरातला जाणारे संपूर्ण राज्य महामार्ग आदिवासी बांधवांनी बंद केले आहेत. याशिवाय आदिवासी बांधवांचा सुरगाणा, पेठ हरसुल, दिंडोरी आदी भागात रास्ता रोको करण्यात आला आहे. 

महत्त्वाचे म्हणजे नाशिक-गुजरात पेठ मार्ग गेल्या 48 तासापासून बंद आहे. हा महामार्ग आजदेखील पूर्णपणे बंद असेल. परिणामी 15-20 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. गुजरातला जाणाऱ्या लक्झरी सेवा देखील दोन दिवसापासून बंद आहेत. महामार्गावर परिवहन विभागातर्फे वाहन चालकांना जेवण व पाण्याचे सुविधा पुरविण्यात आली आहे. 

नक्की वाचा - बीडमध्ये लाचखोरीच्या घटना वाढल्या, लाचलुचपत विभाग अलर्टवर, एकाच दिवसात दोन कारवाया!

आदिवासी 17 संवर्ग पेसा पदभरती अंतर्गत आंदोलन चिघळणार असल्याची शक्यता आहे. माजी आमदार जे पी गावित यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी बांधव नाशिकच्या आदिवासी विकास भवनावर उपोषणाला बसणार आहेत. यामध्ये माजी आ. जेपी गावित, मा.जिल्हा बँक उपाध्यक्ष चिंतामण गावित, मा. जिल्हा परिषद सदस्य भास्कर गावित हे देखील सहभागी होणार आहेत. आज सकाळी ११ वाजता आदिवासी विकास भवन आयुक्तालय बाहेर ते उपोषणाला बसणार आहेत. सरकारने निर्णय न घेतल्यास बेमुदत उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. आदिवासी पेसा अंतर्गत परीक्षा दिलेल्या उमेदवारांचे आंदोलन चिघळण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

दोन दिवसापासून गुजरातला जाणारे सर्व महामार्ग बंद असून यामध्ये सुरगाणा वणी, पेठ ,हरसुल, हरसूल या गावांनी देखील बंदमध्ये सहभाग घेतला आहे. या बंदमध्ये महाराष्ट्रातील 13 जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी देखील सहभाग नोंदविला आहे. माजी आमदार जे पी गावित यांच्या नेतृत्वाखाली  आदिवासी आयुक्ताच्या बाहेर आंदोलन करण्यात येणार आहे. 

Advertisement