Nashik News: 'मी माफी मागणार नाही, सस्पेंड केलं तरी चालेल', मंत्र्यांनी डॉ. बाबासाहेबांचे नाव घेणे टाळलं अन्..

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना संपवायचं काम करायचं नाही अशा शब्दात त्यांनी मंत्र्यांना सुनावलं.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात मंत्री गिरीश महाजन यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेतले नाही
  • माधवी जाधव या वनविभागातील कर्मचाऱ्याने यावर आक्षेप घेतला
  • माधवी जाधव यांनी यावेळी पालकमंत्र्यांनी मोठी चूक केली आहे असं सांगितलं
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
नाशिक:

प्रजासत्ताक दिना निमित्त नाशिकच्या पोलीस परेड मैदानावर हाय होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. प्रजासत्ताक दिन सोहळ्यादरम्यान वनविभागाच्या महिला कर्मचाऱ्याने जोरदार गोंधळ घातला. प्रजासत्ताक दिनाच्या भाषणादरम्यान मंत्री गिरीश महाजन यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव का घेतलं नाही? असा या महिला कर्मचाऱ्याचा आक्षेप होता. संविधान निर्माण करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव आपण पुसू देणार नाही असं त्या म्हणत होत्या. मंत्र्यांनी अनेकांची नावं घेतली, ज्यांचा संविधानाशी संबंध ही नाही. पण डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेणे त्यांनी टाळले ही त्यांनी मोठी चुक केली असं त्या म्हणत होत्या. यामुळे एकच गोंधळ उडाला. 

माधवी जाधव असं या महिला कर्मचाऱ्याचं नाव आहे. त्या वनविभागात काम करतात. मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते आज ध्वजारोहण झाले. त्यावेळी भाषणाच्या सुरूवातीला त्यांनी अनेकांची नावं घेतली. पण त्याच वेळी त्यांनी संबंधीन निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेतले नाही. यावर माधवी जाधव यांनी जोरदार आक्षेप घेतला. संविधान हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केली. त्यांची ओळख पुसली जात आहे. तसे होवू देणार नाही असं ही त्या यावेळी म्हणाल्या. 

नक्की वाचा - Tension In Mahayuti: आमचा संयम सुटला तर....! एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्याचा भाजपला इशारा

बाबासाहेबांमुळे सर्वांना समान न्याय हक्क मिळाला. 15 ऑगस्ट 26 जानेवारी आपल्यासाठी महत्वाचे नाही. पण संविधान हे आपल्यासाठी महत्वाचे आहे असं ही त्यांनी यावेळी सांगितलं. यावेळी त्यांनी बोलण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना रोखण्यात आलं. पालकमंत्र्यांनी मोठी चुक केली आहे. काही झालं तरी मी माफी मागणार नाही.  पण पालकमंत्र्यांनी मोठी चुक केली आहे. मला मिडीयाशी घेणे देणे नाही. मी मातीचं काम करेन. मला सस्पेंड केलं तरी चालेल असं ही त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना सुनावलं.

नक्की वाचा - Buldhana News: झेंडावंदन करताना अनर्थ घडला! मुख्याध्यापकाच्या मृत्यूने गावावर शोककळा; शाळेत काय घडलं?

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना संपवायचं काम करायचं नाही अशा शब्दात त्यांनी मंत्र्यांना सुनावलं. काही झालं तरी आम्ही बाबासाहेबांची ओळख पुसू देणार नाही. मी तुम्ही आम्ही सर्व जण संविधानामुळे आहोत हे कुणी विसरू नका. जाती भेद दुर व्हावा यासाठी त्यांनीच काम केलं. त्यांनी सर्वांना समानता दिली. अशा बाबासाहेबांचे नाव मंत्र्यांनी घेतले नाही असं ही त्या म्हणाल्या. दरम्यान अनावधानाने डॉ. बाबासाहेबांचे नाव घेण्याचे राहून गेले. त्याबाबत दिलगिरी व्यक्त करतो असं नंतर गिरीष महाजन यांनी स्पष्ट केलं.  

Advertisement