अमोल सराफ, बुलढाणा:
Buldhana Teacher Heart Attack News: देशभरात भारतीय प्रजासत्ताक दिनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील गावागावांमधील शाळा, महाविद्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदन करण्यात आले. लोकशाहीच्या या उत्सवात लहानांपासून थोरांपर्यंत सर्वच उत्साहाने सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. प्रजासत्ताक दिनाचा उत्सव सुरु असतानाच बुलढाण्यामधून एक दुर्दैवी बातमी समोर आली आहे. बुलढाण्यात ध्वजवंदनावेळीच मुख्याध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
PCMC News: पिंपरी चिंचवडमध्ये हायटेक सुरक्षा कवच! AI च्या मदतीने गुन्हेगारीवर वचक; काय आहे प्लॅन?
ध्वजवंदन करताना हार्ट अटॅक
याबाबत सविस्तर माहिती अशी की, प्रजासत्ताक दिनाचा उत्साह सर्वत्र शिगेला पोहोचलेला असताना बुलढाणा जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मोताळा तालुक्यातील मोहेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ध्वजारोहण सोहळा सुरू असतानाच मुख्याध्यापक दिलीप राठोड यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. एकीकडे उत्सव सुरु असतानाच आनंदाच्या क्षणी घडलेल्या या मृत्यूमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
मुख्याध्यापकाचा मृत्यू
आज २६ जानेवारी रोजी सकाळी शाळेच्या प्रांगणात विद्यार्थी, ग्रामस्थ आणि शिक्षक राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यासाठी जमले होते. मुख्याध्यापक म्हणून दिलीप राठोड हे ध्वजारोहण करण्यासाठी पुढे आले. याचवेळी काही क्षण आधीच त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि ते अचानक कोसळले. उपस्थित शिक्षकांनी आणि ग्रामस्थांनी त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world