वैमानिकाचे हेलिकॉप्टर पुढे भन्नाट प्रपोज! गुडघे टेकले, अंगठी काढली, थेट लग्नाची मागणी, तरूणी म्हणाली...

पण घरात पत्नीच खरी बॉस असते असं यावेळी भारतने आवर्जून सांगितलं.

जाहिरात
Read Time: 2 mins
नाशिक:

राहुल वाघ 

Nashik News: काही क्षण हे खास असतात. हे खास क्षण अविस्मणीय करण्यासाठी काही भन्नाट शक्कल लढवतात. अशीच एक भन्नाट शक्कल  नाशिकच्या कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलच्या दीक्षांत संचलनानंतर लढवली गेली. इथं एका भावनिक प्रसंगाने उपस्थितांची मने जिंकली. भारत भारद्वाज यांनी वैमानिक म्हणून प्रशिक्षण पूर्ण केलं. आता ते  नव्या जबाबदारीसाठी सज्ज झालेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी आणखी एक गोष्ट मनावर घेतली. ती म्हणजे त्यांच्या लग्नाची. म्हणून भारत यांनी या संचलनानंतर आपली प्रेयसी आरुषीला यांनी  सर्वांसमोर लग्नासाठी मागणी घातली.

दीक्षांत सोहळा संपल्यानंतर हेलिकॉप्टरसमोर गुडघ्यावर बसत भारत यांनी आरुषीला प्रपोज केलं. गुडघ्यावर बसत त्यांनी खिशातून अंगठी काढली. त्यानंत ती अंगठी आरुषीच्या बोटात घातली. शिवाय तू माझ्याशी लग्न करशील का असं प्रपोज केलं. आयुषीला याची काहीच कल्पना नव्हती. अचानक आलेल्या या प्रपोजमुळे ती काही क्षण गोंधळली. पण लगेचच सावरत तीने हे प्रपोजल कबुल केलं.  त्यानंतर काही क्षण ती लाजली आणि भारतच्या मिठीत विसावली. 

Advertisement

नक्की वाचा - Pune News: लुप्त झालेलं गाव धरणाच्या पोटातून बाहेर आलं, गावकरी झाले भावूक, गाव पाहण्यासाठी मोठी गर्दी

हा क्षण तिथे असलेल्या भारतच्या मित्रांनी कॅमेऱ्यात कैद केला. सध्या हा व्हिडीओ सगळीकडे व्हायरल होत आहे.  या अनपेक्षित क्षणाने उपस्थित अधिकारी, भारतचे कुटुंबीय आणि मित्रमंडळी भारावून गेले. आरुषीनेही सर्वांसमोर हा प्रस्ताव स्वीकारला. त्यानंतर सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले. दोघांनी सर्वांचे अभिनंदन स्विकारले. ऑफिसमध्ये अधिकारी म्हणून रोज सॅल्युट मिळतो,करावा ही लागतो, पण घरात पत्नीच खरी बॉस असते असं यावेळी भारतने आवर्जून सांगितलं. 

नक्की वाचा - Shocking news: धक्कादायक! 80 वर्षाच्या आजीवर 28 वर्षाच्या तरुणाचा अत्याचार, मदतीच्या बहाण्याने केलं कृत्य

 पुढे बोलतना ते म्हणाले की त्यामुळेच हा माझ्याकडून प्रेमाचा सॅल्युट होता. विशेष म्हणजे आपल्यासाठी असे काही खास सरप्राईज असेल याची मुळीच कल्पना नव्हती असं आरुषीने बोलताना सांगितलं. आपण या प्रपोजमुळे भारवून गेले शिवाय खूप खूष असल्याचं ही त्यांनी यावेळी सांगितलं. भारतसाठी आजचा दिवस खास होता. देशसेवेच्या शपथेसोबतच प्रेमाचीही नवी सुरुवात करणारा हा क्षण सर्वांसाठी कधी ही न विसरणाराच ठरला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.