नाशिकच्या (Nashik News Crime) आडगाव परिसरात एक दुःखद घटना समोर आली आहे. अमृतधाम परिसरातील एका बांधकाम साइटवरील तळ्यात तीन शाळकरी मित्र पोहण्यासाठी गेले होते. पाऊस सुरू असल्याने तिघांनीही एकत्रितपणे पोहायला जाण्याचा प्लान केला. मात्र यातच तिघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
साई जाधव, साई गरड आणि साई उगले अशी तिघांची नावे आहेत. काल सकाळपासून घरातून ही मुलं बेपत्ता झाली होती, कुटुंबीयांनी त्यांचा अगदी त्र्यंबकेश्वरपर्यंत शोध घेतला असता ते सापडले नाही. दरम्यान आडगाव पोलीस ठाण्यात रात्री बेपत्ता झाल्याबाबत तक्रार देण्यात आली होती आणि आज सकाळी घराजवळीलच साइटवर तळ्यात त्यांचे मृतदेह आढळून आले.
नक्की वाचा - Chhatrapati Sambhajinagar Crime : एक मोमोजची डिश पडली 20 लाखाला; तरुणासोबत भयंकर घडलं!
याप्रकरणी नाशिकच्या आडगाव पोलीस ठाण्यात बांधकाम व्यावसायिक विजय शेखालिया आणि कंत्राटदार आकाश गायकवाड विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरक्षेची कोणतेही खबरदारी घेतली नसल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला असून याप्रकरणी आडगाव पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे.