Navi Mumbai News: तुर्भेतील कंपनीत गॅस गळती! 25 महिला कामगार बेशुद्ध, अन्य 27 जणांवरही परिणाम

कार्बन मोनॉक्साईड गॅसची गळती झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
नवी मुंबई:

राहुल कांबळे 

नवी मुंबईच्या तुर्भे एमआयडीसी भागातील आंबेडकर नगरजवळील डी-326 क्रमांकाच्या औद्योगिक युनिटमध्ये आज सकाळी गंभीर घटना घडली. कामावर असलेल्या महिला कामगारांना अचानक श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. डोके दुखू लागले. काही क्षणांत तब्बल 20 ते 25 महिला कामगार बेशुद्ध अवस्थेत खाली कोसळल्या. प्राथमिक माहितीवरून युनिटमध्ये वापरला जाणारा कार्बन मोनॉक्साईड (CO) वायू गळती झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. एकूण  27 जणांना या विषारी वायूचा प्रभाव झाला असून त्यांना तात्काळ वाशी येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामध्ये बहुसंख्य महिला कामगार असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

या घटनेनंतर तुर्भे एमआयडीसी परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक पोलीस, अग्निशमन दल आणि आपत्कालीन व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले. संबंधित कंपनीतून तत्काळ काम थांबवून सर्व मजूरांना बाहेर काढण्यात आले आहे. गॅस गळतीचा मुख्य स्रोत शोधण्यासाठी आणि नियंत्रणासाठी यंत्रणांनी तातडीने कारवाई सुरू केली आहे.  नवी मुंबई महापालिका आणि औद्योगिक सुरक्षा विभागाने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे. तुर्भे एमआयडीसी पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क आहेत. स्थानिक आमदार आणि नगरसेवकांनीही रुग्णालयात जाऊन जखमी मजुरांची भेट घेतली आहे. शिवाय मदतीचे आश्वासन दिले आहे.

ट्रेंडिंग बातमी - Beed News: 13 वर्षांची मुलगी, 30 वर्षांचा नवरा, एकाच मांडवात दोघांशी लग्न, पुढे जे घडलं ते...

कार्बन मोनॉक्साईड गॅसची गळती झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. कंपनीतील एका यंत्रामध्ये अती तापमानामुळे ही गळती झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गॅस गळतीला कारणीभूत ठरणाऱ्या यंत्राचा तपास सुरू आहे. औद्योगिक सुरक्षा विभागाकडून संपूर्ण युनिटच्या ऑडिटचे आदेश देण्यात आले आहेत. शिवाय वायू गळतीचे प्रमुख कारण ही शोधले जात आहे. कंपनीकडून काही चुक झाली आहे का याची ही माहिती घेतली जात आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Jalgaon News: अंगावर काटा आणणारी घटना! वडीलांना शॉक लागला म्हणून लेक वाचवायला गेली, पण तिही...

नवी मुंबई वाशी एमजीएम रुग्णालयातीलट्र डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, जास्तकरून रुग्ण बेशुद्धावस्थेत किंवा चक्कर येणे, डोकेदुखी, श्वास घेण्यास त्रास अशा तक्रारी घेऊन आले होते. काही रुग्णांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवले जात आहे. तर तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.संबंधित कंपनीवर तुर्भे औद्योगिक सुरक्षिततेच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवला जाऊ शकतो. दरम्यान सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर होत आहे. पण काही जण अजूनही निरिक्षणा खाली आहेत.

Advertisement