Navi Mumbai News : हार्बर रेल्वे विस्कळीत; नेरुळ स्थानकात तांत्रिक बिघाड, प्रवाशांचे हाल

रेल्वे प्रशासनाकडून बिघाड दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, प्रवाशांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

जाहिरात
Read Time: 1 min

राहुल कांबळे, नवी मुंबई

Harbour Railway : नवी मुंबई नेरुळ दरम्यान तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन विस्कळीत झाली आहे. नेरुळ रेल्वे स्थानकाच्या आसपास आज सकाळी अचानक तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हार्बर लाईनवरील प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. याचा थेट परिणाम ट्रान्स-हार्बर मार्गावर देखील झाला असून, पनवेल, वाशी, ठाणे, सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या अनेक लोकल ट्रेन उशीराने धावत आहेत.

सकाळच्या कार्यालयीन वेळेत ही अडचण निर्माण झाल्यामुळे हजारो प्रवासी अडकल्याचे चित्र अनेक स्थानकांवर पाहायला मिळाले. ट्रेन काही वेळासाठी थांबवण्यात आल्या होत्या तर काही ट्रेन रद्द करण्यात आल्या असल्याचे प्राथमिक माहितीवरून समजते.

रेल्वे प्रशासनाकडून बिघाड दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, प्रवाशांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे. वाशी-पनवेल, वाशी-ठाणे मार्गावरील सेवा प्रभावित झाली असून सीएसएमटीकडे जाणाऱ्या हार्बर लोकल ट्रेनमध्ये विलंबाने धावत आहेत. काही ट्रेन वाशी स्थानकातच थांबवण्यात आल्या आहेत. 

Topics mentioned in this article