राहुल कांबळे, नवी मुंबई
नवी मुंबई महापालिका अंतर्गत वाशी येथील महापालिका रुग्णालयात कार्यरत असलेल्या अधीक्षक डॉ. राजेश म्हात्रे यांचा काही राजकीय पक्षांकडून कथित अवमान करण्यात आल्याने डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या प्रकाराचा तीव्र निषेध करण्यासाठी नेरुळसह बेलापूर, ऐरोली, घणसोली आणि इतर महापालिका रुग्णालयांमध्ये डॉक्टरांनी काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केला. अधीक्षक डॉ. राजेश म्हात्रे यांचा काही राजकीय पक्षांकडून अंगावर कफनाचा कपडा टाकून अवमान करण्यात आल्याने डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांनी निषेध व्यक्त केला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय घडलं होतं?
दोन दिवसांपूर्वी 2000 रुपये घेताना एक महापालिका कर्मचाऱ्यांचा व्हिडीओ प्रसारित झाला होता. याच कारणावरून मनसे कार्यकर्त्यांनी त्याचा अवमान केला होता. नवी मुंबई वाशी सार्वजनिक रूग्णालय येथील शवागारात कार्यरत कर्मचारी यांच्याकडून मृतदेह गुंडाळण्यासाठी लागणाऱ्या कपड्यांसाठी तब्बल दोन हजार रुपयाची लाज घेताना व्हिडिओ प्रसारित झाला होता. त्या अनुषंगाने महापालिका आरोग्य विभागामार्फत तातडीने कारवाई करण्यात आली आहे. संबंधित व्यक्ती कंत्राटी कामगार असल्याने त्याच्यावर कारवाईच्या सूचना देण्यात आली आहे.
(नक्की वाचा - Marathi Municipal School Closed : मराठी भाषा कशी वाचणार? गेल्या 13 वर्षात 131 मराठी शाळांना लागलं कुलूप)
डॉ. म्हात्रे यांच्यावर झालेल्या अवमानकारक वर्तनामुळे आरोग्य सेवा क्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी भयग्रस्त झाले आहेत. त्यामुळे डॉ. म्हात्रे यांना पोलिस संरक्षण देण्याची मागणी करण्यात येत आहे. तसेच, संबंधित राजकीय पदाधिकाऱ्यांनी जाहीर माफी मागावी, अशी आग्रही भूमिका वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.
महापालिका प्रशासनाकडून या प्रकाराची चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, संबंधित घटनेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य कर्मचाऱ्यांनी संघटीत पद्धतीने आवाज उठवण्यास सुरुवात केली असून, लवकरात लवकर न्याय मिळावा अशी मागणी केली जात आहे. वाशी पोलीस ठाण्यात मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल कराण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे.
(नक्की वाचा- Mumbai Local : लटकणाऱ्यांना रेल्वेचे 'हँडल', बंद दरवाजांपाठोपाठ आणखी एक विचित्र निर्णय)
प्रमुख मागण्या
- डॉ. राजेश म्हात्रे यांना तात्काळ पोलिस संरक्षण द्यावे.
- रुग्णालय परिसरात पोलीस चौकी असावी.
- संबंधित राजकीय पदाधिकाऱ्यांनी जाहीर माफी मागावी.
- वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा सन्मान राखावा आणि अशा प्रकारांना आळा घालावा.