Kalyan News : कल्याणच्या 'या' पेट्रोल पंपावर पेट्रोल-डिझेलचे दर वाढले, संध्याकाळी 4 वाजता शुकशुकाट

कल्याणमधील पेट्रोल पंपावरही दुचाकी,चार चाकी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे.नायरा पेट्रोल पंपावर पेट्रोल प्रतिलीटरमागे 5 रुपये तर डिझेलची किंमत 3 रुपयांनी वाढली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Kalyan Nayara Petrol Pump News
मुंबई:

Kalyan Nayra Petrol Pump News : कल्याणमधील पेट्रोल पंपावरही दुचाकी,चार चाकी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे. लॉकडाऊनची अफवा पसरल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचं सांगण्यात येतंय.आता तर एका खासगी कंपनीने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे.नायरा पेट्रोल पंपावर पेट्रोल प्रतिलीटरमागे 5 रुपये तर डिझेलची किंमत 3 रुपयांनी वाढली आहे.विशेष म्हणजे दरवाढ करुन देखील पेट्रोल पंपवार पेट्रोल डिझेल चार वाजताच संपल्याचं समोर आलं. कल्याणनजीक नेवाळी फाटा येथील नायरा पेट्रोल पंपावर दरवाढ करण्यात आली आहे. 

पेट्रोल पंप मालक गणेश लामतुरे काय म्हणाले?

या संदर्भात पेट्रोल पंप मालक गणेश लामतुरे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय की,"आमच्या कंपनीने पेट्रोलमागे 5 रुपये आणि डिझेलमागे 3 रुपये वाढ केली आहे. ही दरवाढ कंपनीकडून करण्यात आली आहे. सध्या पुरवठा एक दिवसाआड आहे.ग्राहकांची थोडी गैरसोय होत आहे.पेट्रोल पुरवठा करणाऱ्या गाड्या थोड्या उशिरा येत आहेत. पुरवठा पूर्णपणे आहे.

Advertisement

नक्की वाचा >> Pune News: एकवीरा देवीच्या यात्रेत तुफान राडा! कल्याण,पनवेलच्या भाविकांकडून दगडफेक, अनेकांची पळापळ, पाहा Video

दररोज आमच्या पंपावर 5 हजार लिटर  पेट्रोल विक्री होते.सध्या लोक पॅनिक होत आहेत. त्यांना समजत नाही.त्यांना वाटते की,पेट्रोल डिझेलचा तुटवडा होईल.बंद पडेल.असा विषय काही नाही.पेट्रोल डिझेलचा साठा पुरेसा आहे.त्यामुळे ग्राहकांनी घाबरुन जाऊ नये. कंपनीने कशामुळे वाढ केली हे अद्याप आम्हाला सांगितलेले नाही"

नक्की वाचा >> Mumbai News: पश्चिम रेल्वे विस्कळीत! विरार–वैतरणा दरम्यान भीषण अपघात; डाऊन मार्ग ठप्प झाल्याने प्रवाशांचे हाल