जाहिरात

Mumbai News: पश्चिम रेल्वे विस्कळीत! विरार–वैतरणा दरम्यान भीषण अपघात; डाऊन मार्ग ठप्प झाल्याने प्रवाशांचे हाल

विरार आणि वैतरणा स्थानकादरम्यान आज दुपारी घडलेल्या गंभीर रेल्वे अपघातामुळे पश्चिम रेल्वेची डाऊन मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली.

Mumbai News: पश्चिम रेल्वे विस्कळीत! विरार–वैतरणा दरम्यान भीषण अपघात; डाऊन मार्ग ठप्प झाल्याने प्रवाशांचे हाल
Western Railway News Today
मुंबई:

मनोज सातवी, प्रतिनिधी

Mumbai Western Railway Update : विरार आणि वैतरणा स्थानकादरम्यान आज दुपारी घडलेल्या गंभीर रेल्वे अपघातामुळे पश्चिम रेल्वेची डाऊन मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. चेन्नई-अहमदाबाद एक्स्प्रेससमोर अचानक एक अज्ञात व्यक्ती आल्याने हा अपघात झाला.अपघात इतका भीषण होता की संबंधित व्यक्ती एक्सप्रेसच्या समोरील जाळीत अडकला. त्यामुळे गाडी तातडीनं थांबवावी लागली. सध्या मृतदेह बाहेर काढण्याचे काम पूर्ण झाले असून एक तासाहून अधिक काळ डाऊन मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

डहाणू लोकल नारिंगी–घासकोपरी दरम्यान थांबवण्यात आली

या घटनेचा फटका लोकल सेवेलाही बसला असून विरारहून सुटणारी 3:05 वाजताची डहाणू लोकल नारिंगी–घासकोपरी दरम्यान थांबवण्यात आली होती.तसच 3:45 वाजताची विरार–डहाणू लोकल विरार स्थानकातच रोखून ठेवण्यात आली. डहाणू आणि गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या अनेक गाड्या खोळंबल्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

नक्की वाचा >>  Pune News : पुण्यात खळबळ, रिच फिल स्पा सेंटरवर छापा टाकताच पोलिसही हादरले, आतमध्ये सुरु होता भयंकर प्रकार

सध्या रेल्वे प्रशासनाकडून अपघात ग्रस्त व्यक्तीचा गाडीच्या जाळीत अडकलेला मृतदेह बाहेर काढण्यात रेल्वे प्रशासन आणि अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले असून परिस्थिती पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com