देवा राखुंडे, बारामती
बारामती लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा पराभव अजित पवार यांच्या चांगलाचा जिव्हारी लागला आहे. अजित पवार यांनी पुन्हा एकदा पराभवाबद्दल भाष्य केलं आहे. एवढं काम करुनही बारामतीकर असा निर्णय घेऊ शकतात, तर बारामतील वेगळा आमदार मिळाला पाहिजे, असं अजितप पवार यांनी म्हटलं आहे. बारामतीतील एका पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमात अजित पवार बोलत होते.
अजित पवारांना म्हटलं की, बारामतीत न सांगता कामं होत आहेत. पण मनात विचार येतो एवढ सगळं करून पण बारामतीकर वेगळा निर्णय घेतात. अशी जर गंमत होणार असेल तर झाकली मूठ सव्वा लाखाची चांगली. जिथं पिकतं तिथं विकत नसतं. बारामतीकरांना मी सोडून दुसरा कुणीतरी आमदार मिळाला पाहिजे. मग तुम्ही 1991 ते 2024 या माझ्या कारकिर्दीची तुलना करा आणि त्या माणसाचं काम बघा, असं अजित पवार म्हणाले. मात्र आम्हाला दादाच पाहिजेत अशी घोषणाबाजी कार्यकर्त्यांनी त्यांच्यासमोरच सुरु केली.
बारामतीत 34 वर्षे काम कराताना एकाही समाजावर अन्याय होऊ दिला नाही. मात्र आता गरज सरो आणि वैद्य मरो, असं होतं कामा नये. उद्याची निवडणूक राज्याच्या आणि बारामतीकरांच्या भवितव्याची आहे. सत्तेत असू तर अर्थकारणाला गती मिळेल.कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवले पाहिजेत, असंही अजित पवार यांनी म्हटलं.