मोठी बातमी! छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीला

Political news : कालच छगन भुजबळ यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली होती.

Advertisement
Read Time: 2 mins

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत. शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी भुजबळ दाखल झाले आहेत. भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.

कालच छगन भुजबळ यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली होती. छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीला गेल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

छगन भुजबळ महायुतीमध्ये नाराज असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात आहेत. या चर्चांच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. मात्र भेटीचं नेमंक कारण अद्याप समोर आलेलं नाही. 

(नक्की वाचा- Arvind Kejriwal Delhi liquor Scam : अरविंद केजरीवाल यांच्या अर्जावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी)

चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?

छगन भुजबळ-शरद पवार यांच्या भेटीवर भाजपचे प्रदेशाध्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं की, महाराष्ट्रात सामाजिक घडामोडी होत आहे, त्याला अनुसरून ही भेट असू शकते. भेटीनंतर भुजबळ स्वतः भेट का होती हे स्पष्ट करतील.

भुजबळ महायुती चे मोठे नेते आहे. महायुतीला नुकसान होईल असे कोणतेही पाऊल ते उचलणार नाही. शरद पवार यांना भेटणे यात काहीही गैर नाही. आम्हीही अनेक वेळेला त्यांना भेटतो. भुजबळ कुठलाही निर्णय घेतील असे मला वाटत नाही, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं. 

Advertisement

(नक्की वाचा - पायी वारी करणाऱ्यांना मिळणार पेन्शन, राज्य सरकारकडून ‘वारकरी महामंडळ'ची स्थापना)

छगन भुजबळ महाविकास आघाडीत येतील असे वाटत नाही- दानवे

शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी याबाबत म्हटलं की, छगन भुजबळ का भेटायला गेले माहीत नाही. कदाचित चर्चा करायला गेले असतील. पण छगन भुजबळ महाविकास आघाडीत येतील असे वाटत नाही. शरद पवार यांच्यावर टीका केल्यानंतर मनाला काहीतरी वाटलं असेल म्हणून छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीला गेले असावेत. 

Topics mentioned in this article