NCP Politics : शरद पवार गटाचे अस्वस्थ आमदार फुटण्याच्या मार्गावर; सूत्रांची माहिती

NCP sharad pawar : शरद पवार गटातील खासदारांपेक्षा आमदार सत्ता नसल्याने अस्वस्थ झाले आहेत, अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांकडून मिळत आहे.

जाहिरात
Read Time: 1 min

Maharashtra Political news : शरद पवार आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार असल्याच्या चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरु होत्या. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील अशी चर्चा सुरु असतानाच आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदार फुटण्याच्या मार्गावर असल्याची माहिती सूत्रांकडू मिळत आहे.  

शरद पवार गटातील खासदारांपेक्षा आमदार सत्ता नसल्याने अस्वस्थ झाले आहेत, अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांकडून मिळत आहे. NCP शरद पवार गटातील आमदारांना सत्तेचे वेध लागल्याचं समजतंय. विरोधी पक्षात राहून मतदारसंघातील कामे होत नसल्याने आमदार अस्वस्थ असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. 

Advertisement

सत्तेत जायला हवे, ही आमदारांची शरद पवारांकडे आग्रही मागणी आहे. मात्र भाजपसोबत युती नाही ही शरद पवार यांची ठाम भूमिका आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. आमदारांना सत्तेचे वेध लागले असले तरी पक्षातील कार्यकर्ते आणि सर्व खासदार शरद पवार यांच्या पाठीशी असल्याचा दावा केला जात आहे. 

काही दिवसांपूर्वी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांवर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी कालमर्यादा नाही. ही कालमर्यादा ५ ते २० वर्षे अशी कितीही असू शकते, अशी भूमिका सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली होती.

Topics mentioned in this article