NCP NEWS : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने संघटनात्मक पातळीवर एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पक्षाने नुकतीच 15 नव्या अधिकृत प्रवक्त्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीत काही प्रमुख आणि चर्चेत असलेल्या नावांचा समावेश असल्याने राजकीय वर्तुळात याची चर्चा सुरू आहे.
विशेष म्हणजे, या यादीत अभिनेत्री स्वरा भास्करचे पती फहाद अहमद आणि पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेतील मारहाण प्रकरणी चर्चेत आलेले आमदार नितीन देशमुख यांनाही स्थान मिळाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे.
(नक्की वाचा- Political News : पालकमंत्री पदावरून महायुतीत नाराजीनाज्या? एकनाथ शिंदेंसह गोगावलेंची कॅबिनेट बैठकीला दांडी)
नव्याने नियुक्त झालेल्या प्रवक्त्यांची यादी
- विद्याताई चव्हाण
- अंकुश काकडे
- सुधाकर भालेराव
- भीमराव हत्तीअंबिरे
- महेश तपासे
- विकास लावंडे
- सक्षणा सलगर
- मेहबुब शेख
- फहाद अहमद
- राजा राजपुरकर
- मनाली भिलारे
- नितीन देशमुख
- क्लाइड क्रास्टो
- राखी जाधव
- रचना वैद्य
नव्याने जाहीर झालेल्या यादीतील काही नावे विशेष लक्ष वेधून घेत आहेत. अभिनेत्री स्वरा भास्करचे पती फहाद अहमद यांना या यादीत स्थान मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. फहाद अहमद आता ते राजकीय भूमिका मांडताना दिसणार आहेत. फहाद यांनी विधानसभा निवडणूक देखील लढवली होती. त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता.
(नक्की वाचा- कल्याण-शिळफाटा मार्गावरील 11 ते 31 ऑगस्टदरम्यान वाहतुकीत मोठे बदल; कोणते मार्ग बंद आणि पर्यायी मार्ग?)
याशिवाय, विधानसभेच्या मारहाण प्रकरणात नेहमी चर्चेत असलेले आमदार नितीन देशमुख यांनाही पक्षाने प्रवक्तेपदाची जबाबदारी दिली आहे. यावरून पक्षाने आक्रमक आणि स्पष्ट भूमिका घेणाऱ्या नेत्यांना महत्त्व दिल्याचे स्पष्ट होत आहे.
ही नवीन प्रवक्त्यांची टीम आगामी काळात पक्षाची ध्येयधोरणे आणि भूमिका अधिक प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काम करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.