NDTV Maharashtracha Jahirnama : युगेंद्र पवारांसमोर उमेदवार देणे टाळता आलं असतं का? रुपाली चाकणकरांनी म्हटलं...

Rupali Chakankar in NDTV Maharashtracha Jahirnama : देशाला काय हवं हे जनतेच्या माध्यामातून ठरवलं जातं. उमेदवार देणे टाळता आलं असतं. मात्र उमेदवार देणे टाळण्यापेक्षा ज्या व्यक्तीने बारामतीचा विकास केला, महाराष्ट्राला चागलं व्हिजन  दिलं ती व्यक्ती बारामतीतून येते.

जाहिरात
Read Time: 3 mins

बारामती विधानसभा मतदारसंघात काका-पुतण्यामध्ये सामना रंगणार आहे. अजित पवार आणि युगेंद्र पवार हे या निवडणुकीच्या निमित्ताने आमने-सामने आले आहेत. मात्र युगेंद्र पवार यांची ही पहिली निवडणूक आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून युगेंद्र पवार राजकारणात प्रवेश करत आहेत. युगेंद्र पवारांविरोधात उमेदवार देणे टाळता आलं असतं का? यावर बोलताना राष्ट्रवादीच्या नेत्यांना रुपाली चाकणकर यांनी म्हटलं की, निवडणुकांना सामोरे जाताना लोकशाहीचा भाग म्हणून समाजाला काय हवं याचा विचार करावा लागतो. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

देशाला काय हवं हे जनतेच्या माध्यामातून ठरवलं जातं. उमेदवार देणे टाळता आलं असतं. मात्र उमेदवार देणे टाळण्यापेक्षा ज्या व्यक्तीने बारामतीचा विकास केला, महाराष्ट्राला चागलं व्हिजन  दिलं ती व्यक्ती बारामतीतून येते. त्यामुळे त्यांच्याविरोधात कुणीही येथून निवडणूक लढवली तरी फारसा फरक पडणार नाही. लोकशाही पद्धतीने ही निवडणूक लढवली जाईल. निवडणुकीनंतर लोकांचा कौल सर्वांना दिसेल, असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलं. NDTV मराठीच्या 'महाराष्ट्राचा जाहीरनामा' या कार्यक्रम रुपाली चाकणकर बोलत होत्या.

राजकारणातील घराणेशाहीवर बोलताना रुपाली चाकणकर यांनी म्हटलं की, वडील डॉक्टर आहेत म्हणून मुलगा डॉक्टर होत नाही. लोक एकदा संधी देतात, मात्र वारंवार संधी देत नाहीत. जनतेला आपण काय दिलंय, लोकप्रतिनिधीने काय काम केले हे लोक पाहतात. मला असं वाटत घराणेशाहीचा आरोप सर्वच पक्षांवर केले जातात. घराणेशाहीमुळे अनेकांना राजकारणात सहज प्रवेश मिळतो. मात्र त्यानंतर त्यांना स्वत:चं कर्तृत्व सिद्ध करावं लागतं, असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलं.  

Rupali Chakankar

(नक्की वाचा-  NDTV Maharashtracha Jahirnama : 'जरांगे फॅक्टर' मराठवाड्यातल्या एक-दोन जिल्ह्यात मर्यादित, छगन भुजबळांचं टीकास्त्र)

मनसे महायुतीसोबत का नाही?

लोकसभेच्या निवडणुका वेगळ्या मुद्यावर लढवल्या गेल्या होत्या. मनसे त्यावेळी आमच्यासोबत होती. मात्र विधानसभेला 288 जागा आहेत. अशात कार्यकर्त्यांना संधी मिळावी अशी प्रत्येक पक्षाची इच्छा असते. आपला कार्यकर्ता त्या भागात वाढला पाहिजे. कार्यकर्ता वाढला तर पक्ष वाढतो. कार्यकर्ता हाच पक्षाचा कणा असतो. कार्यकर्ता जपण्याचा प्रयत्न मनसेने केला आहे. मनसेची आम्हाला काही ठिकाणी साथ नक्की मिळेल. मनसेच्या सर्व उमेदवारांना रुपाली चाकणकर यांनी शुभेच्छा दिल्या. 

Advertisement

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरुन विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना रुपाली चाकणकर यांनी म्हटलं की,  संजय गांधी योजनेसारख्या अनेक योजना याआधी राबवल्या गेल्या. त्या योजना देखील मोफत होत्या. त्यावेळी विरोधकांनी म्हणजेच आता सत्तेत असलेल्यांनी विरोधाचं राजकारण केलं नाही. आता विरोधात कोणत्याही घटनेचा संबंध लाडकी बहीण योजनेशी जोडतात. कारण त्यांना या योजनेची धास्ती वाटत आहे. संयज गांधी योजना आजही सुरु आहे मात्र आम्ही त्याचा संबंध आम्ही कुठेही जोडला नाही. 

(नक्की वाचा- 'नांदगाव मतदारसंघात कांदेंची दहशत', छगन भुजबळांचा थेट आरोप)

लाडकी बहीणमुळे आर्थिक साक्षरता आली

आर्थिक दुर्बल घटकातील महिलांसाठी ही योजना आहे. महिलांच्या खात्यात थेट पेसै जमा या योजनेमुळे जमा होत आहेत. आज महिला कागदपत्र गोळा करत आहेत, बँकेत जात आहे, नवऱ्यासोबत नाहीतर तिचं स्वत:च बँक अकाऊंट आहे. राजकारणाच्या इतिहासात हे पहिल्यांदा घडत आहे. २ कोटी ४० लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा होतात. अर्थिक साक्षरता यातून निर्माण झाली आहे. 

Advertisement