जाहिरात

NDTV Maharashtracha Jahirnama : 'जरांगे फॅक्टर' मराठवाड्यातल्या एक-दोन जिल्ह्यात मर्यादित, छगन भुजबळांचं टीकास्त्र

Chagan Bhujbal in NDTV Conclave : लाडकी बहीण योजना महाविकास आघाडी सरकार आलं तर बंद होईल. महायुती सरकार आलं तर ही योजना सुरु राहील ही हमी आम्ही देतो. कारण आम्ही योजना बंद केली तर लोक सरकार चालू देणार नाही. लोक आम्हाला बाहेर फिरु देणार नाहीत, असंही छगन भुजबळ यांनी म्हटलं. 

NDTV Maharashtracha Jahirnama : 'जरांगे फॅक्टर' मराठवाड्यातल्या एक-दोन जिल्ह्यात मर्यादित, छगन भुजबळांचं टीकास्त्र

Chagan Bhujbal in NDTV Conclave : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यात मनोज जरांगे फॅक्टर नाही, असं थेट वक्तव्य केलं आहे. मनोज जरांगे फॅक्टर मराठवाड्यातील एक-दोन जिल्ह्यांपुरता मर्यादित आहे. राज्यातील निवडणुका विकासाच्या मुद्द्यावर लढवल्या जातील. जाती-पातीचं राजकारण होणार नाही, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.  NDTV मराठी 'महाराष्ट्राचा जाहीरनामा' या कार्यक्रमात छगन भुजबळ सहभागी झाले होते. 

ओबीसी आरक्षणाविरोधात कुणीतरी जात आहे किंवा ओबीसी आरक्षणाला धक्का लावला जात आहे, असं वाटतं तेव्हा मला बोलावं लागतं. ओबीसी आरक्षणाला धक्का नको हे मी एकटा नाही म्हणत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार सगळे हेच म्हणत आहे.  माझं कुणाशीही वैयक्तिक भांडण नाही. मग माझं कुठं काय चुकलंय, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं.

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मराठा आरक्षणांचं जे आंदोलन सुरु आहे, तो विषय मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मर्यादित आहे. त्याचा फारसा परीणाम उर्वरित महाराष्ट्रात होणार नाही. राखीव जागा सोडल्या तर इतरत्र अनेक ठिकाणी मराठा समाजाचेच उमेदवार जास्त आहेत. त्यामुळे जरांगे फॅक्टर हा मुद्दाच नाही, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं. 

महायुतीच्या जागावाटपाचं चित्र उद्यापर्यंत स्पष्ट होईल

महायुतीतील जागावाटपाबाबत बोलताना छगन भुजबळ यांनी म्हटलं की, जागावाटपाचा घोळ महाविकास आघाडी आणि महायुती दोन्ही बाजूला आहे. कुठला उमेदवार कुठे निवडून येईल हे पाहिलं जातं. तुमच्या पक्षाची ताकद आहे, मात्र चांगला उमेदवार दुसऱ्या पक्षाकडे असेल तरीही तिथे अदलाबदली केली जाते. महायुतीत वाटाघाटी अजूनही सुरु आहे. सुनील तटकरे आणि अजित पवार यांच्यासोबत अजूनही चर्चा सुरु आहे. महायुतीच्या जागावाटपाचं चित्र उद्यापर्यंत स्पष्ट होईल, अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली.

Chagan Bhujabal In NDTV Conclave

Chagan Bhujabal In NDTV Conclave

(नक्की वाचा- 'नांदगाव मतदारसंघात कांदेंची दहशत', छगन भुजबळांचा थेट आरोप)

समीर भुजबळ जिथे (नांदगाव मतदारसंघ) उभे राहिले आहेत तिथली परिस्थिती फार विचित्र आहे. तिथे लोकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे.  कुणी बोलू शकत नाही, असा गंभीर आरोप छगन भुजबळ यांनी आमदार सुहास कांदे यांच्यावर केला आहे. सुहास कांदे हे भाजप, काँग्रेस असा सर्वांनाच त्रास देतात, त्यांची ती सवय आहेत. स्थानिक लोकांना जाऊन विचारलं तर लोक सांगतील. मात्र ते बोलतील की नाही माहिती नाही. लोक आता दहशतीच्या बाहेर येऊन निवडणुकीत मतदान करतील, असा दावा देखील छगन भुजबळ यांनी केला.  

विधानसभा निवडणूक विकासाच्या मुद्द्यांवरच लढवली जाणार आहे. लाडकी बहीण योजना सर्वांसाठी आहे. त्यात कुठेही जात-पात नाही. प्रत्येक समाजाचा आणि घटकाचा विकास याच मुद्द्यावर निवडणुका लढवल्या जातात. आरक्षणाच्या मागण्यांवरुन लोकप्रिय योजनांचा धडाका लावला गेला असा आरोप विरोधक करत आहेत. यावर बोलताना छगन भुजबळ यांनी म्हटलं की, निवडणुका आल्या की विरोधक आरोप सुरु करतात. त्यात काही गैर नाही. मत मिळवण्यासाठी हे सर्वच करतात.

लाडकी बहीण योजना बंद केली तर...

लाडकी बहीण योजना महाविकास आघाडी सरकार आलं तर बंद होईल. मात्र महायुती सरकार आलं तर ही योजना सुरु राहील ही हमी आम्ही देतो. कारण आम्ही योजना बंद केली तर लोक सरकार चालू देणार नाही. लोक आम्हाला बाहेर देखील फिरु देणार नाहीत, असंही छगन भुजबळ यांनी म्हटलं. 

येवल्यात यंदांची निवडणूक कठीण?

येवल्यात निवडणूक कठीण आहे असं बोललं जात आहे. यावर बोलताना छगन भुजबळ यांनी म्हटलं की, मी गेली 20 वर्ष तिथे विकासकामे करत आहेत. कुठेही जातीपातीचं राजकारण केलं नाही. मुंबई-नाशिकचा महामार्ग मी करुन घेतला. येवल्याला जाण्याचा रस्ता केला. सगळ्या सोई-सुविधा तिथे केल्या. त्यामुळे लोक मला विकासाच्या मुद्यावर निवडून देतील, असा विश्वास छगन भुजबळ यांनी व्यक्त केला. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com