8 hours ago

NDTV Marathi Manch Conclave LIVE: एनडीटीव्ही मराठी चॅनेलच्या 'NDTV मराठी मंच' या अनोखा आणि भव्यदिव्य कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमामध्ये विविध क्षेत्रातील दिग्गजांनी उपस्थित राहून महत्त्वपूर्ण माहिती सांगितली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या महायुती शासनाचे 100 दिवस, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची 100 वर्षे, एनडीटीव्ही मराठीचे पहिली वर्षपूर्ती अशा विविध औचित्यांच्या निमित्ताने आयोजित या विशेष कार्यक्रमात राजकारण, राज्याचा विकास, उद्योग, मनोरंजन या आणि अशा अन्य क्षेत्रातील नामवंत व्यक्ती 'एनडीटीव्ही मराठीए मंच' वर एकत्र  आल्या होत्या. 

Apr 23, 2025 20:33 (IST)

NDTV Marathi Manch: 'पहलगाममधील हल्ल्याला जबाबदार असलेल्यांना धडा शिकवा', RSS ची मोदी सरकारकडं मागणी

NDTV Marathi Manch Conclave : देशाच्या शांतता आणि एकतेवर हा हल्ला आहे. त्यांना असा धडा शिकवणे आवश्यक आहे, अशी मागणी रा.स्व. संघानं केली आहे.

Apr 23, 2025 20:32 (IST)

NDTV Marathi Manch: भाजपावर RSS चा रिमोट कंट्रोल आहे? RSS च्या ज्येष्ठ अधिकाऱ्यानं सांगितली Inside Story

NDTV Marathi Manch : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (Rashtriya Swayamsevak Sangh)  आणि भारतीय जनता पार्टीचे (Bharatiya Janata Party) संबंध कसे आहेत? हा सर्वत्र चर्चेचा विषय आहे.

Apr 23, 2025 20:32 (IST)

पुढील दोन वर्षांत बृहन्मुंबईमधील महत्त्वाचे मेट्रो प्रकल्प पूर्ण होतील आणि अजून त्याच्या 3-4 वर्षात MMRमधील सर्व मेट्रो प्रकल्प पूर्ण होतील : अश्विनी भिडे, मुंबई मेट्रो कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक

Apr 23, 2025 20:25 (IST)

NDTV Marathi Manch: नगरसेवक नसल्याने खरोखर अडचण होते का? मुंबई मनपा आयुक्त भूषण गगराणी काय म्हणाले?

गेल्या काही वर्षात निवडणूका झालेल्या नाहीत. त्यामुळे नगरसेवक मुंबई महापालिकेत नाहीत.

Advertisement
Apr 23, 2025 20:23 (IST)

NDTV Marathi Manch: वाढवण बंदर गेमचेंजर ठरणार, नितेश राणेंना विश्वास

या एका बंदारमुळे पालघर परिसराचा चेहरा मोहरा बदलणार आहे. शिवाय जवळपास 1 लाख थेट रोजगार वाढवणमुळे मिळणार आहेत असं राणे यांनी यावेळी स्पष्ट केलं.

Apr 23, 2025 20:14 (IST)

जिथे तुम्हाला माणुसकी दाखवण्याची संधी मिळतेय तिथे दाखवा. ती संधी जर तुम्ही गमावली तर तुम्ही आयुष्याभर स्वतःला दोष देत राहाल : सिद्धेश लोकरे,सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर  

Advertisement
Apr 23, 2025 20:05 (IST)

मला खाण्याची आणि इतरांना त्याबाबत रेकमेंड करण्याचीही आवड आहे. बऱ्याच ठिकाणांना भेट द्यायचो, पण याद्वारे आपल्याला कॉन्टेंट पण निर्माण करता येईल, याचा विचार नव्हता केला तर तशी माझ्या फुडी अ‍ॅक्टर इंजिनिअर पेजची सुरुवात झाली. : रोहित मावळे, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर  

Apr 23, 2025 20:01 (IST)

छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले जे गड-किल्ले आहेत, ते आपली संपत्ती आहे. त्या संपत्तीकडे आपण कधीही दुर्लक्ष करू शकत नाही. सर्व गडकिल्ल्यांचा मान राखून तिथे जाऊन फोटो काढणे, तिकडच्या गोष्टी येणाऱ्या पिढीला दाखवणे गरजेचे आहे. : गणेश वनारे, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर  

Advertisement
Apr 23, 2025 19:56 (IST)

गावातल्या गोष्टी शहरातल्या माणसांना दाखवणे, शहरातल्या गोष्टी गावातल्या माणसांना दाखवणे. पर्यटन स्थळांवरील फोटो अशा पद्धतीने काढले की इतरांनाही तेथे जाऊन फोटो काढावेत. आपल्या फोटोग्राफीने काही-न्-काही तरी महाराष्ट्रासाठी योगदान देणे जेणेकरून पर्यटन वगैरे इत्यादी गोष्टी वाढाव्यात. आपला महाराष्ट्र किती सुंदर आहे, तो सर्वांना दाखवावा हे माझं मी कर्तव्य समजतो: गणेश वनारे, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर  

Apr 23, 2025 19:44 (IST)

जर आपण भारतातल्या मातीतले विषय मांडले नाहीत तर आपल्यासारखे मूर्ख आपणच ठरू: ओम राऊत, लेखक-दिग्दर्शक 

Apr 23, 2025 19:31 (IST)

आम्हाला विमानतळासाठी जी जागा देण्यात आली होती, तिथं विमानतळ होऊ शकतं यावर विश्वास नव्हता. येथील भौगोलिक परिस्थिती खूप आव्हानात्मक होती. या जागेला विमानतळासाठी तयार करणे हे आमचं मुख्य आव्हान होतं. आम्ही सर्वांच्या सहकार्याने मेहनत घेतली: चारुदत्त देशमुख, नवी मुंबई विमानतळाचे प्लानिंग आणि डिझाइन हेड

2017 साली साईटवर प्रत्यक्ष काम झालं. कोव्हिड काळातही काम सुरु होतं. ऑगस्ट महिन्यात पहिला टप्पा आम्ही सुरू करू. आम्ही विमानतळाची क्षमता वाढवली. अन्यथा तो 10 वर्षांमध्येच फुल झाला असता. त्यामुळे नव्या विमानतळाची गरज आम्ही 15 वर्ष पुढे ढकलली आहे: चारुदत्त देशमुख, नवी मुंबई विमानतळाचे प्लानिंग आणि डिझाइन हेड

 

दोन विमानतळ एकमेकांना जोडलेले पाहिजे ही धारणा बरोबर नाही. कोणतही विमानतळ स्वतंत्रपणे काम करतं. हे सत्य असलं तरी आपण दोन्ही विमातळाला जोडणारी मेट्रो रेल्वे सुरू करत आहोत. त्याचा फायदा या भागातील रहिवाशांना होणार आहे: चारुदत्त देशमुख, नवी मुंबई विमानतळाचे प्लानिंग आणि डिझाइन हेड

हे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही विमानतळ असेल. त्याचबरोबर आपल्या देशातील सर्वात मोठं जनरल विमानांचं टर्मिनल इथं उभा करण्यात आला आहे. त्याचा फायदा आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला होईल. इथं 90 प्रायव्हेट जेट उभे राहू शकतील. या उद्योगाला याचा मोठा फायदा होईल. त्यासाठी आवश्यक असलेलं मनुष्यबळ पुणे आणि मुंबई शहरात उपलब्ध आहे. त्याला चालना मिळेल: चारुदत्त देशमुख, नवी मुंबई विमानतळाचे प्लानिंग आणि डिझाइन हेड

मालवाहतूक करण्यासाठी इथं पाच कार्गो टर्मिनल उभारण्यात आली आहेत. त्याची क्षमता मुंबईच्या विमानतळाच्या क्षमतेपेक्षा तिप्पट आहे. हा विमानतळ जगभरातील विमानतळासाठी बेंचमार्क असेल. जगभरातील लोकं आम्हाला असा विमानतळ हवा असं म्हणतील: चारुदत्त देशमुख, नवी मुंबई विमानतळाचे प्लानिंग आणि डिझाइन हेड

Apr 23, 2025 19:24 (IST)

काही सिनेमे खूप चांगल्या होतात, त्यामागील तुमचा हेतू लोकांना खरंच काहीतरी नवीन दाखवण्याचा असेल तर मला वाटतं तुमची वाटचाल बरोबर सुरू आहे: पल्लवी जोशी, अभिनेत्री

Apr 23, 2025 19:12 (IST)

धारावीत लाखो लोक खूप वाईट अवस्थेत राहातात. त्यांना आता हक्काचे घर मिळणार आहे. जवळपास पात्र 2 लाख लोकांना तिथेच घर मिळणार आहे. तर अन्य लोकांना मुंबई इतर ठिकाणी घर दिलं जाईल. 

जी घरं दिली जाणार आहेत, त्याची किंमत जवळपास एक कोटी रुपयांच्या घरात आहे. त्यामुळे मुंबईत चांगलं घर या प्रकल्पाच्या माध्यमातून मिळेल. बंगले फक्त आम्हीच बांधायचे का? गरिबांचेही जीवन सुधारले पाहिजे ही सरकारची भूमिका आहे : एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री

Apr 23, 2025 18:39 (IST)

महाराष्ट्रात पर्यटनाच्या खूप गोष्टी आहेत पण, महाराष्ट्र ब्रँडिग आणि सुविधांमध्ये कमी पडतो. पर्यटक मुंबईत येतात पण, तिथून जयपूर, आग्रा, इंदूर, केरळ, गोव्याला जातात. आपल्याकडं पायाभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणात विकास करण्याची गरज आहे. गोव्याचा विकास झाला तसा कोकणाचा विकास झाला नाही. या गोष्टी बदलण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती आवश्यक आहे: शैलेश पाटील, केसरी टुर्सचे व्यवस्थापकीय संचालक

Apr 23, 2025 18:35 (IST)

आपल्या देशात धार्मिक पर्यटनाला मोठं भविष्य आहे. आपण धार्मिक कार्यक्रमाचं उत्तम व्यवस्थापन करु शकतो हे कुंभमेळ्यानं देशाला दाखवलं आहे. कुंभमेळ्यात करोडो लोक आली पण तरीही स्वच्छता आणि सुरक्षितता उत्तम होती. तेथील अनुभवाचा फायदा नाशिकमधील कुंभमेळ्यात आपल्याला होईल : विशाल कामत, कामत हॉटेल्स इंडिया लिमिटेडचे कार्यकारी संचालक 

Apr 23, 2025 18:33 (IST)

जम्मू काश्मीरमध्ये आमची हॉटेल्स आहेत. आज आम्हाला लोक म्हणतात आम्ही तुमच्या हॉटेलमध्ये येऊन राहतो. आमच्या हॉटेलमध्ये रोज राष्ट्रगीत होतं. काश्मीरमध्ये राष्ट्रगीत होणारं हे एकमेव हॉटेल आहे.  तिथं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा फोटो लावण्यात आला आहे, तिथं आता पर्यटक यायला लागली आहेत: शैलेश पाटील, केसरी टुर्सचे व्यवस्थापकीय संचालक 

दहशतवादी हल्ल्यामुळे  काश्मीर मागं गेलंय पण, सरकार कठोर कारवाई करेल आणि काश्मीर पुन्हा पूर्वपदावर येईल : शैलेश पाटील, केसरी टुर्सचे व्यवस्थापकीय संचालक 

आता सोशल मीडिया खूप प्रगत झाला आहे. तो तुम्हाला सर्व घडामोडी लाईव्ह दाखवतो. मुंबईवरही हल्ला झाला होता, त्यानंतरही मुंबई सुरू राहिली.  तसंच इथं होईल, हे सरकार गप्प बसणारं नाही : शैलेश पाटील, केसरी टुर्सचे व्यवस्थापकीय संचालक 

Apr 23, 2025 18:32 (IST)

पहलगाममध्ये झालेला दहशतवादी हल्ला हा अत्यंत निंदनीय आणि माणुसकीला काळीमा फासणारा आहे. ही घटना घडली त्या ठिकाणी मी 15 दिवसांपूर्वी होतो. मोदी सरकारनं कोरोनानंतर काश्मीर सुरळीत केलं होतं. या घटनेमुळे काश्मीर खूप मागे गेलं: शैलेश पाटील, केसरी टुर्सचे व्यवस्थापकीय संचालक 

Apr 23, 2025 18:25 (IST)

- मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, मला त्याचा अभिमान आहे. शेतीत रमतो. माझी मातीशी नाळ जुळलीय. काही लोक घरातून निघत नाही ते थेट परदेशात जातात मी गावी जातो: एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री

- मुख्यमंत्री होण्याआधी अडीच वर्ष स्थगितीचं सरकार होतं : एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री

- सध्या राज्यात आठ ते दहा हजार कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू आहेत. दळणवळणाच्या सुविधा महत्त्वाच्या आहेत. मुंबई नागपूर हा रस्ता आमच्या सरकारने चांगल्या पद्धतीने तयार केला. त्यामुळे सात तासांत मुंबईत पोहोचता येते. वेळ, इंधनाची बचत होतेय.  हा एकपर्यावरणपूरक प्रकल्प आम्ही करून दाखवला : एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री

Apr 23, 2025 18:23 (IST)

टीकेला कामातून उत्तर दिले. भूमिका बदली नाही. तिघांनी टीम म्हणून काम केलं. आजही तसंच काम करतोय. आमचा खुर्चीचा अजेंडा नाही: एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री

धारावी पुनर्विकास प्रकल्प हा आशियातील सर्वात मोठा प्रकल्प आहे. धारावी म्हटलं की तिथला चिखल, उघडी गटारं, वाहतं पाणी, तिथेच लोक राहातात, तिथेच व्यवसाय करतात. त्याचं जीवनमान उंचावण्याची गरज होती. त्यांना हक्काची घरं देणं गरजेचं होतं. ते काम धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या माध्यमातून होत आहे: एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री

Apr 23, 2025 18:20 (IST)

पहलगाम घटनेचे जशास तसे उत्तर मिळेल. दहशतवादी बिळात बसले होते ते आता परत आले आहेत. त्याचा बदला आता जवान घेतील. बलिदान व्यर्थ जाणार नाही. पाकिस्तानला अद्दल घडवावी लागेल: एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री

Apr 23, 2025 18:19 (IST)

पहलगाममधील घटना दुर्दैवी. माणुसकीला काळिमा फासणारं काम केलं आहे. निंदा करावी तेवढी थोडी आहे. निषेध देशाने नाही जगाने केला पाहिजे: एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री

Apr 23, 2025 17:45 (IST)

मी शेतीमध्ये जातो, रमतो. माझी मातीशी नाळ जुळलेली आहे. गावाला जाणे गुन्हा आहे का? काही लोक घरातून निघतात अन् परदेशात जातात. मी गावी जातो : एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री

Apr 23, 2025 17:45 (IST)

सरकार म्हणून सर्व सामान्यांच्या आयुष्यात चांगले दिवस आणणे सरकारचे काम आहे. काही लोक सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येतात. आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही, पण सर्वसामान्यांच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आणले.: एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री

Apr 23, 2025 17:05 (IST)

सह्याद्री फर्मने द्राक्ष पिकाची निवड केली आणि यातून सह्याद्रीची सुरुवात झाली. पहिल्या पाच वर्षात सर्वात जास्त द्राक्ष निर्यात करणारी कंपनी म्हणून आम्ही ओळख मिळवली. त्यानंतरचा टप्पा दूधाचा आहे. दूध हे एकच उत्पादन दीडशे पद्धतीने ते ग्राहकांपर्यंत नेता येते. चितळे बंधू यांचं मोठं उदाहरण आहे. सह्याद्री फर्मने फळपिकांच्या मार्गाने आपली जागतिक पातळीवर वेगळी ओळख निर्माण केली आहे. सह्याद्री फर्म 42 देशांमध्ये द्राक्षांची निर्यात करते : सह्याद्री फर्मचे विलास शिंदे 

Apr 23, 2025 17:04 (IST)

एखादी कंपनी जेव्हा सुरु होते तेव्हा ती नवी आयडिया असते किंवा नवा विचार असतो. स्टार्टअप कल्चरल आणि फार्म प्रोड्युसर कंपनी कल्चर एकाच वेळी समोर आले. सह्याद्री फर्मबाबत आधीपासून स्पष्टता होती. शेतकऱ्यांचे जेवढे प्रश्न आहेत ते एकत्र येऊन सोडवायचे आहेत, अशी या मागची संकल्पना होती. त्यासाठी लागणारं भांडवल, मनुष्यबळ, तंत्रज्ञान असेल याची जुळवाजुळव करायची ही स्पष्टता होती. छोटा शेतकरी म्हणून मला सन्मानाने जगता येईल येवढं उत्पन्न मिळेल, ज्याला मागणी आहे असेच पीक निवडली पाहिजेत. मराठवाड्यात फळ पिकांची, विशेषतः लिंबूवर्गीय फळांची वाढ होण्याची क्षमता आहे. एखादं पीक पुढे नेताना त्याला धोरण हवं: सह्याद्री फर्मचे विलास शिंदे 

Apr 23, 2025 17:01 (IST)

सरकारने हे सुनिश्चित केले पाहिजे की योजनांचे फायदे योग्य लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत आणि स्टार्टअप कंपन्यांनी स्वतःची ओळख निर्माण केल्यानंतर त्यांना पाठिंबा देणे आवश्यक आहे : विद्याधर अनासकर,एमएससी बँकेचे चेअरमन 

Apr 23, 2025 17:01 (IST)

शासनाकडून मिळणारे अनुदान पाहून स्टार्टअप्सने यात जाऊ नये. तो एक बोनस समजावा. मात्र तोच फोकस ठेवून जाल तर तुमचं व्यवसायाकडे दुर्लक्ष होऊ शकतं. मात्र बँकांनी आपली धोरणे बदलली तर महाराष्ट्र 100 टक्के स्टार्टअप्समध्ये नंबर वनला जाईल: विद्याधर अनासकर,एमएससी बँकेचे चेअरमन 

Apr 23, 2025 17:00 (IST)

बँकांनी स्टार्टअप्सना गरज असेल तेवढे पैसे दिले पाहिजेत. स्टार्टअप्सना उत्पन्न कमावायला बँकांनी भाग पाडलं पाहिजे. त्या उत्पन्नातून रिकव्हरी हा फोकस बँकांचा असला पाहिजे. मालमत्तांमधून रिकव्हरी हा बँकाचा फोकस नसावा. बँकानी हा बदल आपल्या धोरणात केला, तर स्टार्टअप निश्चितच मदत होईल : विद्याधर अनासकर,एमएससी बँकेचे चेअरमन 

Apr 23, 2025 16:59 (IST)

बँकर्सनी सिक्युरिटी ओरिएंटेड बँकिंग सोडून दिली पाहिजे. स्टार्टअप्स सुरू करताना बँका लोन देताना सिक्युरिटी काय आहे याची विचारणा आधी करतात. अनेकदा सिक्युरिटी नसल्याने लोन मिळत नाही. स्टार्टअप्सना फायनान्स करताना सिक्युरिटीपेक्षा नेमका प्रोजेक्ट काय आहे हे तपासलं पाहिजे: विद्याधर अनासकर,एमएससी बँकेचे चेअरमन 

Apr 23, 2025 16:58 (IST)

महाराष्ट्रात समुद्र आहे, पठार आहे, चांगला मान्सून आहे. त्यामुळे शेतीचं उत्पादन वाढवलं आणि तिकडे मूल्यवर्धन केलं तर ग्लोबल ट्रेड वॉरमध्ये भारताला जगाचं किचन बनायची क्षमता आणि संधी आहे. विकसित राज्य म्हणून आपली देशभरात ओळख आहे. इन्फ्रास्ट्रक्चर कसं निर्माण करायचं याची जाण आपल्याला आहे. इतर राज्यांमध्ये हे अजून कमी आहे, याचा फायदा करून अनेक संधी आपण निर्माण करु शकतो: इंद्रनील चितळे,चितळे उद्योगसमूहाचे प्रमुख 

Apr 23, 2025 16:55 (IST)

फूड इंडस्ट्री म्हणून लोकांशी इमोशनल कनेक्ट जपायचा असतो. चितळे समूहाने तोच इमोशनल कनेक्ट जपत जपत ग्राहकांचा प्रतिसाद मिळवला. यातून वेगवेगळ्या देशांमध्ये व्यवसाय करायला संधी मिळाली. मेड इन महाराष्ट्र प्रोडक्ट बाहेर जातो, हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे.: इंद्रनील चितळे,चितळे उद्योगसमूहाचे प्रमुख 

Apr 23, 2025 16:46 (IST)

मल्याळम सिनेमा नाविन्यपूर्ण, हृदयाला स्पर्श करणारे सिनेमा देत आहे आणि मला हे सिनेमे पाहायला आवडतात :संयमी खेर, अभिनेत्री

Apr 23, 2025 16:45 (IST)

मराठीमध्येही खूप सिनेमे होत गेले पण गुणवत्ता कमी पडली. 2011-12मध्ये सिनेमे कमी झाले पण दर्जेदार सिनेमे पाहायला मिळाले :संयमी खेर, अभिनेत्री

Apr 23, 2025 16:41 (IST)

सर्व उद्देश व्यापाऱ्याच्या दृष्टिकोन आहेत. ते थोडेसे विसरुन थोडे दिलदार होऊन चित्रपट करा, जो लोकांपर्यंत पोहोचेल:संयमी खेर, अभिनेत्री

Apr 23, 2025 16:30 (IST)

अभिनय हा देखील व्यवसाय आहे. त्यातही खूप पैसा जातो. पैसा पुन्हा मिळाला नाही तर निर्माता त्यामध्ये पैसा टाकणार नाही:संयमी खेर, अभिनेत्री

Apr 23, 2025 16:27 (IST)

प्रेक्षक ठरवतात त्यांना काय पाहायचंय, काय नाही पाहायचंय - संयमी खेर, अभिनेत्री

Apr 23, 2025 15:45 (IST)

उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांनी एकत्र यायचं की नाही त्यांच्या घरातल्या अर्धांगिनींना विचारा. त्यांच्या घरातील भांडणं आम्हाला कसं विचारता? : नितेश राणे, मंत्री

Apr 23, 2025 15:42 (IST)

मे महिन्याअखेरपर्यंत मुंबई गोवा महामार्ग पूर्ण होणार आहे - नितेश राणे, मंत्री

Apr 23, 2025 15:35 (IST)

शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्यची स्थापना केली. हिंदू मंदिरं तोडली जात होती. मुघलांकडून अत्याचार सुरू होते. त्याला विरोध करण्यासाठी जिजाऊंनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करायला लावली. शिवाजी महाराज हे सेक्युलर नव्हते. ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक होते : नितेश राणे,मंत्री

Apr 23, 2025 15:32 (IST)

हिंदुत्व हा आमचा गाभा. त्यावर कान टोचण्याचा प्रश्नच येत नाही. हिंदुत्वावर तडजोड नाही : नितेश राणे,मंत्री

Apr 23, 2025 15:31 (IST)

हिंदुत्वावरुन मुख्यमंत्री फडणवीसांनी माझे कान टोचले नाहीत, तर त्यांनी सल्ले दिले. हिंदुत्वावर राणेंना थांबवणार नाही, असेही ते म्हणाले : नितेश राणे,मंत्री

Apr 23, 2025 15:25 (IST)

आपण कांदा देशभर पुरवतो. पण, कांद्याचे स्टोरेज वाढवणे आवश्यक आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना सवलती देणं आवश्यक आहे. त्यामुळे कांद्याची साठवण होईल. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होईल. आगामी काळात द्राक्षाची जागतिक स्तरावर जात विकसित करणे त्याची निर्यात करणे आवश्यक आहे. संत्रा उत्पादन कसं वाढवता येईल याकडं विशेष लक्ष देण्याची गरज आहे.:केंद्रीय मंत्री नितीन गडकरी  

समुद्र किनाऱ्यावरील जिल्ह्याची इकोनॉमी विकसित करण्याची आवश्यक आहे. मच्छिमार 100 नॉटिकल मैल समुद्रात गेले तर त्यांचं सागरी उत्पादन वाढू शकते. मासेमारीच्या माध्यमातून ही इकोनॉमी 2 लाख कोटींचे ठेवण्याचे लक्ष्य आहे:केंद्रीय मंत्री नितीन गडकरी  

कोकणात आंबा आहे. पण आंब्याचे कोल्ड स्टोरेजची कमी आहेत. त्यांना मिळणाऱ्या वीजेचे दर जास्त आहेत. त्यासाठी सोलारमध्ये ऊर्जा देणे आवश्यक आहे. महाराष्ट्रचा निर्यातीमधील पहिला क्रमांक कायम ठेवायचा आहे.:केंद्रीय मंत्री नितीन गडकरी  

Apr 23, 2025 15:21 (IST)

महाराष्ट्रात पाणी हा सर्वात कळीचा मुद्दा. येणाऱ्या काळात सिंचनाचे क्षेत्र वाढवण्याचे गरज आहे. आपण जी धरणं बांधली त्यामध्ये जे पाणी साठवलं त्याचा योग्य उपयोग होतो की नाही हे पाहिलं पाहिजे. हे पाणी शेतकऱ्यांना पोहोचवण्यास पहिलं प्राधान्य द्यायला हवे: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी  

विदर्भातील तलाव खोदून त्याची क्षमता वाढवणे आवश्यक आहे. जलसंधारण हा महत्त्वाचा विषय आहे. ग्रामीण विकासाला सुखी समृद्ध करायचं असेल तर सिंचनाबरोबर कोणत्या पिकामध्ये सुखी समृद्ध होणार यावर चिंतन होणे आवश्यक आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी  

इथेनॉलवरचा वापर वाढला पाहिजे. त्याचबरोबर हायड्रोजनकडंही राज्यानं लक्ष देणं आवश्यक आहे. हायड्रोजन हे भविष्य आहे. महानगरपालिका, नगरपालिका क्षेत्रात मोठा कचरा आहे. त्याचे रिसायकलिंग करुन हायड्रोजन करु शकतो. मुंबई ते पुणे रस्त्यावर हायड्रोजनचे पंप आणि वाहन सुरू करण्याचा विचार आहे: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी  

Apr 23, 2025 15:17 (IST)

आर्थिक विकासामध्ये GDP हा महत्त्वाचा घटक आहे. आपल्या देशात पायाभूत सुविधेचं 22 ते 24 टक्के योगदान आहे. या क्षेत्रात राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत आहे. त्यात महाराष्ट्रा नंबर 1 राहिल असा विश्वास आहे: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी  

सर्व्हिस क्षेत्रातही महाराष्ट्र नंबर 1 आहे. कृषी क्षेत्रातही महाराष्ट्रानं अनेक विक्रम केले आहे. या क्षेत्रात अजून काम करणे आवश्यक आहे: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी  

आर्थिकदृष्ट्या मागासलेले जिल्हे हे आदिवासी क्षेत्रातील आहेत. वनवासी आणि आदिवासी क्षेत्रातील विकासाचं मॉडेल तयार करणे आवश्यक आहे:केंद्रीय मंत्री नितीन गडकरी  

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली दुर्गम गडचिरोली जिल्ह्यात मोठी गुंतवणूक येत आहे :केंद्रीय मंत्री नितीन गडकरी 

Apr 23, 2025 15:08 (IST)

सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांचा वापर जेव्हा वाढेल तेव्हा प्रदूषण कमी होईल : सिद्धेश कदम - महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अध्यक्ष

Apr 23, 2025 14:48 (IST)

मुंबईमध्ये बोअरवेलमुळे पाण्याची पातळी कमी होत चालली आहे. या गोष्टी आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही पाणीसाठा जतन करण्यासाठी मुंबई पालिकेला सूचना केल्या आहेत. त्यासोबतच मुंबईमध्ये ज्या पद्धतीने प्रदूषणाचा विषय येत आहे. मुंबईत काँक्रिट रोडचे जाळे पसरत आहे. सिमेंट, मशिनरीचे प्रदूषण कसे थांबवायचे त्यासाठी आम्ही एक निर्णय घेतला. त्यामध्ये नवा प्लॅन हा उघड्यावर नसेल. त्यासोबतच त्याचे कॉन्ट्रॅकर कोणती वाहने वापरतात, ती किती जुनी आहेत. याबाबतही दक्ष आहोत. आपण सर्व खासगी वाहने सोडून सरकारी दळणवळणाची साधने वापरु त्यावेळी हे प्रदूषण नियंत्रणात येईल. त्यासाठी सरकारी सेवांचे जाळे तयार करू : सिद्धेश कदम - महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अध्यक्ष

Apr 23, 2025 14:47 (IST)

एखाद्या कंपनीला लगेच त्यांच्या कंपनीला मदत करुन त्यांची आर्थिक उलाढाल झाली तर त्यामध्ये आमचा सहभाग असणे महत्त्वाचे आहे. नागपूर शहरातील सांडपाणी प्रक्रिया करुन एका थर्मल प्लाँटला जाते. आम्ही सर्व पालिकांना हेच सांगतो की तुमच्या सांडपाण्यापासून नदी नाल्यात न सोडता त्यापासून आर्थिक उलाढाल होईल का? हे पाहणे महत्त्वाचे आहे. आम्ही जनतेशी,कॉलेज विद्यार्थ्यांशी थेट संवाद करण्यासाठी प्रयत्न करतोय. एक चांगला उपक्रम राबवत आहोत. त्याचा आम्हाला फायदा होत आहे: सिद्धेश कदम - महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अध्यक्ष

Apr 23, 2025 14:46 (IST)

नाव न घेता CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला

Apr 23, 2025 14:46 (IST)

प्रदूषण नियंत्रणाच्या योजना काय आहेत?

ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांचे व्हिजन आहे त्यामध्ये आपण बायोडाव्हरसिटीचा बॅलन्स कसा करायचा यामध्ये आमची भूमिका मोठी आहे. त्यात आम्ही छोटी छोटी पाऊले उचलत आहोत त्याचा परिणाम आता नाही पण काही काळाने दिसेल. सिद्धेश कदम - महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अध्यक्ष

आज जनतेला कल्पना नाही की आम्ही काय करतो त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी 100 दिवसांच्या कामांमध्ये वेगवेगळ्या संस्थांशी संवाद सुरू केले आहेत. त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी काम करत आहोत. सामान्य नागरिकांच्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडवण्याचेही प्रयत्न सुरू आहेत, असे सिद्धेश कदम यांनी सांगितले. सिद्धेश कदम - महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अध्यक्ष

Apr 23, 2025 14:41 (IST)

घरातला मुख्यमंत्री कोण?

घरातले जे आमचे तीन पक्षाचे सरकार आहे, त्यामध्ये मी मायनॉरिटीत आहे. बायको आणि मुलगी मेजॉरिटीत आहेत. घराची मुख्यमंत्री मुलगीच आहे. ती जे म्हणेल ते अंतिम वाक्य आहे.: CM देवेंद्र फडणवीस

Apr 23, 2025 14:36 (IST)

देवेंद्र फडणवीस हा भारतीय जनता पक्षाचा एक सैनिक आहे. जिथे सांगितलं तिथे तो काम करतो. महाराष्ट्रात काम करताना मला अतिशय आनंद आहे. महाराष्ट्रातच काम करावं अशी माझी अपेक्षा आहे. ज्या दिवशी माझा पक्ष सांगेल महाराष्ट्राच्या बाहेर काम करायचंय, त्यादिवशी बाहेर जाऊन काम करेन. दिल्लीत सांगितलं तर दिल्लीत करेन आणि ज्या दिवशी पक्ष सांगेल तुमची आता आवश्यकता नाही, तुमच्या घरी जा. त्यादिवशी नागपूरच्या घरी जाऊन बसेन.  : CM देवेंद्र फडणवीस

Apr 23, 2025 14:32 (IST)

केवळ कर्जमाफीची घोषणा केली म्हणून कर्जमाफी करणे योग्य नाही. कर्जमाफी आम्ही करणारच आहोत, योग्य परिस्थिती असेल तेव्हा आम्ही कर्जमाफी करू. याचा अर्थ आम्ही दुष्काळाची वाट पाहतोय असं नाही. त्याच्याआधीही आर्थिक परिस्थिती सुधारली तर आम्ही कर्जमाफी देणारच आहोत. मात्र केवळ घोषणा केली म्हणून बँकांचा फायदा करणे योग्य नाही. याउलट तेच पैसे शेती क्षेत्रात गुंतवले तर त्याचा शेतकऱ्यांना फायदा अधिक होईल: CM देवेंद्र फडणवीस

Apr 23, 2025 14:26 (IST)

मी मुंबईमध्ये राहणारा नॉन रेसिडेन्शिअल नागपूरकर आहे. मी नागपूरकरच आहे पण मुंबई आपली आर्थिक राजधानी आहे. या मुंबईकरता MMR रिजनकरिता देखील माझ्या मनामध्ये प्रेम आहे. म्हणून इथला विकास झाला तर महाराष्ट्राचा विकास होऊ शकतो म्हणूनच मुंबईचे ट्रान्सफॉर्मेशन आणि महाराष्ट्राचे ट्रान्सफॉर्मेशन सातत्याने माझ्या अजेंड्यावर आहे.: CM देवेंद्र फडणवीस

Apr 23, 2025 14:22 (IST)

राज्याला सक्षम विरोधीपक्ष आणि समजदार विरोधी पक्षनेता असणे हे कधीही चांगलं असते.: CM देवेंद्र फडणवीस

देशाला विरोधी पक्षनेता मिळालाय पण सक्षम आणि समजदार आहे का? यावर चर्चा होऊ शकते. म्हणजे मिळणं आणि न मिळणे यातला काही फरक आहे का? हा देखील एक प्रश्नच आहे.  : CM देवेंद्र फडणवीस

Apr 23, 2025 14:16 (IST)

शिंदेसाहेबांचं मन हे महाराष्ट्रात, इथल्या प्रशासनामध्ये, इथल्या राजकारणामध्ये आहे. ते कोणत्याही परिस्थितीत शेतीमध्ये जाणार नाहीत. काही लोक जप करतात सकाळी 9/9.30 वाजता शिंदेसाहेबांना जाऊ द्या तर त्यांचे मनसुबे पूर्ण होणार नाहीत. आम्ही तिघंही इथेच काम करू शेती करणार नाही, शेतकऱ्यांचे कल्याण करू : CM देवेंद्र फडणवीस

Apr 23, 2025 14:04 (IST)

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंवर CM फडणवीसांची प्रतिक्रिया

कोणतेही परिवार एक होत असतील तर आम्हाला त्याची अडचण नाही, त्यांनी जरूर एकत्रित यावे. आम्ही त्यांच्या एकत्रित येण्याचे स्वागत करू.  : CM देवेंद्र फडणवीस

Apr 23, 2025 13:57 (IST)

आमची परिस्थिती सुधारल्यानंतर लाडक्या बहिणींचे अतिरिक्त पैसे आम्ही देऊ, त्यादृष्टीने आमची वाटचाल सुरू आहे  : CM देवेंद्र फडणवीस

Apr 23, 2025 13:52 (IST)

देशातील कोणत्याही राज्यापेक्षा महाराष्ट्राची अर्थव्यवस्था चांगली आहे, स्थिर आहे. : CM देवेंद्र फडणवीस

Apr 23, 2025 13:42 (IST)

धारावीच्या सर्व अडचणी दूर झालेल्या आहेत. फक्त काही नेत्यांच्या डोक्यात अडचणी आहेत आणि काही नेत्यांनी त्या जाणीवपूर्वक तयार करुन ठेवलेल्या आहेत. त्यांच्या डोक्यातून काढण्यासाठीची टेक्नोलॉजी मला अजून सापडलेली नाही ती सापडली तर त्याचाही वापर करण्याचा आपण प्रयत्न करू :CM देवेंद्र फडणवीस

Apr 23, 2025 13:29 (IST)

CM देवेंद्र फडणवीस यांच्याकडून चौथ्या मुंबईची घोषणा

वाढवण बंदरासोबत नवीन वाढवण विमानतळ तयार करतोय, तेथे बुलेट ट्रेनचे स्टेशन तयार करतोय आणि तिथेच आपण कोस्टल रोड घेऊन चाललोय त्यामुळे चौथी मुंबई तिकडे तयार होणार आहे. : CM देवेंद्र फडणवीस 

Apr 23, 2025 13:20 (IST)

कोणतंही खासगी वाहन न घेता लोकांना पब्लिक ट्रान्सपोर्टने एंड-टू-एंड जाता आले पाहिजे. यासंदर्भातील काम आम्ही करतोय :  देवेंद्र फडणवीस,मुख्यमंत्री

Apr 23, 2025 13:15 (IST)

1 मे ते 15 मेदरम्यान इंटीग्रेशन ऑफ तिकिटिंग सर्विस मुंबईकरिता लाँच करणार आणि महिन्याभरामध्ये उर्वरित MMRDA करिताही ही सुविधा लाँच करणार :  देवेंद्र फडणवीस,मुख्यमंत्री

Apr 23, 2025 13:11 (IST)

कुठलेही परिवार एकत्र येत असतील तर त्याची आम्हाला अडचण नाही. आम्ही त्यांचे स्वागत करू: CM देवेंद्र फडणवीस

Apr 23, 2025 13:09 (IST)

विरोधी पक्ष आहेत, विशेषतः उबाठा, शरद पवारसाहेबांची (राकाँ) किंवा काँग्रेस असेल या तीनही पक्षाकडून त्यांच्या नेत्यांना फारशा अपेक्षा दिसत नाहीयेत किंवा त्यांना भविष्य दिसत नाहीयेत. या पक्षांमध्ये नेतृत्वाची समस्या दिसत आहे:  देवेंद्र फडणवीस,मुख्यमंत्री

Apr 23, 2025 13:01 (IST)

कितीही वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या चालवल्या तरी आमचा समन्वय चांगला आहे. एकमेकांना सोबत घेऊन आम्ही काम करत आहोत. कोणासाठीही पॉलिटीकल स्पेस राहणार नाही, आम्ही तिघे मिळून सर्व सगळी राजकीय स्पेस व्यापून टाकणार आहोत. त्यामुळे कोणाकरिता काही स्पेस राहणार नाही:  देवेंद्र फडणवीस,मुख्यमंत्री

Apr 23, 2025 12:59 (IST)

एनडीटीव्ही मराठीच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा. वर्षभरात तुम्ही मराठी माध्यमांमध्ये स्वतःची वेगळी जागा निर्माण करू शकलात,ही उल्लेखनीय बाब आहे : देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

Apr 23, 2025 12:51 (IST)

काश्मीरमध्ये जो भ्याड हल्ला झाला, त्याचा मी निषेध करतो. हल्लेखोरांना हे हवंय आम्ही थांबलो पाहिजे. पण भारत थांबणार नाही. मास्टरमाइंड, हल्लेखोरांना योग्य उत्तर भारत निश्चितपणे देईल: देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

Apr 23, 2025 12:40 (IST)

कोल्हापूरकरांचाही शक्तिपीठ मार्गाला विरोध राहिलेला नाही : मेघना बोर्डीकर - महिला आणि बाल कल्याण मंत्री

Apr 23, 2025 12:34 (IST)

गेल्या 100 दिवसांच्या कार्यक्रमात आम्हाला मुख्यमंत्र्यांनी टार्गेट दिले होते. आम्हाला अडीच कोटी महिलांच्या आरोग्याची तपासणी करायची होती, त्यामध्ये 1 कोटी महिलांची आरोग्य तपासणी पूर्ण झाली. ज्या महिला कधी रुग्णालयात जात नव्हत्या, ग्रामीण भागातल्या महिला त्यांची तपासणी झाली. सगळ्या कुटंबाची काळजी करताना त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या महिलाही काळजी घेऊ लागल्या :प्रकाश अबिटकर - सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री

Apr 23, 2025 12:33 (IST)

राज्यातल्या सर्व तपासणी लॅब आहेत त्याच्यावर मॉनिटरींग केले जात नव्हते, त्यामध्ये काही गैरप्रकार होत असल्यास त्याच्यावर कारवाई करण्याचा कोणताही कायदा नव्हता. तो निर्णय आम्ही घेत आहोत. त्यामध्ये या लॅबमध्ये होणाऱ्या तपासणी योग्य प्रकारे होत आहेत का? याची पाहणी केली जाईल आणि गैरप्रकार आढळल्यास त्यावर कारवाई केली जाईल. येणाऱ्या अधिवेशनामध्ये आम्ही हा विषय मांडून त्याच्या कायद्याची अंमलबजावणी करू :प्रकाश अबिटकर - सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री

Apr 23, 2025 12:33 (IST)

राज्यातील तपासणी लॅबबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेणार :प्रकाश अबिटकर - सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री

Apr 23, 2025 12:33 (IST)

आरोग्यव्यवस्था म्हटल्यानंतर साहजिकच तत्काळ उपलब्धता हवी असते ती नाही झाली तर लोक साहजिकच लोक पॅनिक होतात. आरोग्य विभागामध्ये काम करण्याची संधी पहिल्यांदा मला मिळाली. महाराष्ट्राच्या जनतेचे आशीर्वाद घेण्याचे पुण्याईचे काम मला मिळाले :प्रकाश अबिटकर - सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री

Apr 23, 2025 12:24 (IST)

राज्यामध्ये आरोग्याशी संबंधित ज्या काही सुविधांची आवश्यकता आहे, ती अतिशय सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली काम करतोय :प्रकाश अबिटकर - सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री

Apr 23, 2025 12:24 (IST)

पूर्वीपासूनच महाराष्ट्र राज्य असेल किंवा देशामधील आरोग्ययंत्रणेसाठी अत्यंत चांगल्या पद्धतीने संपूर्ण राज्यामध्ये आणि देशामध्ये काम केले जात आहे.आपल्या राज्यामध्येही यासाठी सर्व सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्राथमिक पातळीपासून ते तृतीय पातळीपर्यंत अत्यंत चांगल्या पद्धतीचे काम होत आहे. अलिकडच्या काळामध्ये या सर्वासोबत ज्या पद्धतीने आजारांची, रुग्णांची संख्या वाढतेय यासाठी अजूनही काम करायला पाहिजे. त्यासाठी सुद्धा आवश्यक असणारे फंड्स एका बाजूला राज्य शासनाच्या बजेटमध्ये दुसऱ्या बाजूला केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून तिसऱ्या बाजूला आम्ही ईडीबीचा नवीन प्रपोजल करतोय की ज्यामध्ये आठ झोनमध्ये कॅन्सर रुग्णांसाठी हॉस्पिटलमध्ये उभरतोय, अशा अनेक विषयांच्या निमित्ताने मेडिकल सेक्टरसाठी जे आवश्यक असणाऱ्या इन्फ्रास्ट्रक्चर आहेत, ते आम्ही करत आहोत :प्रकाश अबिटकर - सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री

Apr 23, 2025 12:13 (IST)

दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधील एखाद्या विषयावरुन राज्यातील आरोग्ययंत्रणा सक्षम नाही, असे म्हणणं चुकीचे होईल :प्रकाश अबिटकर - सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री

Apr 23, 2025 12:07 (IST)

'खड्डे तांत्रिकदृष्ट्या भरले गेले पाहिजे'

लोकांना चांगले रस्ते मिळाले पाहिजे, दर्जेदार रस्ते मिळाले पाहिजे, खड्डे भरताना ते तांत्रिकदृष्ट्या भरले गेले पाहिजे. मजुरांना आणलंय त्यांना केवळ खड्डा भरायला लावला, त्यात नुसते डांबर भरले तर हे असे चालणार नाही. मलमपट्टी न करता कायमस्वरुपी मार्ग काढला गेला पाहिजे :शिवेंद्रराजे भोसले - सार्वजनिक बांधकाम मंत्री

Apr 23, 2025 12:02 (IST)

खड्डेमुक्त रस्त्याची संकल्पना

खड्डेमुक्त रस्ता ही संकल्पना राबवली गेलीच पाहिजे आणि ते राबवायचं काम चाललंय.खड्ड्यांच्या तक्रारीसाठी अ‍ॅप्स सुद्धा आहेत, इतक्या बारकाईने काम सुरू आहे:शिवेंद्रराजे भोसले - सार्वजनिक बांधकाम मंत्री

Apr 23, 2025 11:51 (IST)

लाडकी बहीण योजने 2100 रुपये कधी मिळणार?

लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये सुद्धा योग्य वेळेस आल्यास महायुती सरकार महिलांना देणार आहे : मेघना बोर्डीकर - महिला आणि बाल कल्याण मंत्री

Apr 23, 2025 11:51 (IST)

जर एखादी महिला महाराष्ट्रामध्ये राहणारी जी पीएम किसान किंवा नमो किसान सन्मान योजनेचा लाभ घेत असेल तर तिला वरचे पाचशे रुपये म्हणजे दीड हजार रुपये महिन्याप्रमाणे राहतील तर ते तिला मिळणार आहेत. त्यामुळे हा पाचशे रुपयांचा विषय आला आहे. : मेघना बोर्डीकर - महिला आणि बाल कल्याण मंत्री

Apr 23, 2025 11:47 (IST)

मेघना बोर्डीकर यांचे मोठे विधान

कोणताही विकास लाडकी बहीण योजनेमुळे रोखला जाणार नाही : मेघना बोर्डीकर - महिला आणि बाल कल्याण मंत्री

Apr 23, 2025 11:42 (IST)

'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मार्ग काढला'

लाडकी बहीण योजनेतून राज्याच्या तिजोरीवर भार पडतोय, मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यातून मार्ग काढतील. यामुळे राज्याचा विकास रोखला जाणार नाही - मेघना बोर्डीकर, महिला आणि बाल कल्याण मंत्री

Apr 23, 2025 11:39 (IST)

लाडकी बहीण योजनेबाबत विरोधकांनी गोंधळ निर्माण केलाय - मेघना बोर्डीकर 

Apr 23, 2025 11:39 (IST)

लाडकी बहीण योजनेतून मिळणारे 1500 रुपये ग्रामीण भागातील महिलांसाठी बदल घडवणारे आहेत

Apr 23, 2025 11:34 (IST)

एनडीटीव्ही मराठी मंच कार्यक्रमास सुरुवात

Apr 23, 2025 10:48 (IST)

Live Update : 'मंचा'च्या व्यासपीठावर दिग्गजांची मंदियाळी

पहिल्या वहिल्या  NDTV मराठी मंचसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रस्ते विकास आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी, राज्याचे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार, केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह अनेक सुप्रसिद्ध लोक आपले विचार मांडतील.

Apr 23, 2025 10:47 (IST)

Live Update : विरोधकांच्या नजरेतला महाराष्ट्र, राशपचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील NDTV मराठीच्या 'मंचा'वर

Apr 23, 2025 10:46 (IST)

Live Update : 'मंच'ची थोड्याच वेळात होणार सुरुवात

Apr 23, 2025 08:20 (IST)

Live Update : केसरी टूर्सचे शैलेश पाटीलही राहणार उपस्थित

Apr 23, 2025 08:07 (IST)

Live Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'महाराष्ट्र... काल, आज आणि उद्या' या विषयावर बोलणार

Apr 23, 2025 08:04 (IST)

Live Update :राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर राहणार उपस्थित

'मंच' या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर उपस्थित राहणार आहेत. 'संघाची शतकपूर्ती आणि महाराष्ट्र' या विषयावर ते बोलणार आहे.

Apr 23, 2025 07:59 (IST)

Live Update : NDTV मराठीच्या वर्षपूर्तीनिमित्ताने आयोजित कार्यक्रमाला थोड्याच वेळात सुरुवात...

NDTV मराठीच्या वर्षपूर्तीनिमित्ताने आयोजित केलेल्या विशेष 'मंच' या कार्यक्रमाला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे.