
वाढवण बंदरामुळे बंदर क्षेत्रात भारताचं जगातलं स्थान भक्कम होणार आहे. या एका प्रकल्पामुळे तब्बल 1 लाख थेट रोजगार उपलब्ध होणार आहेत. शिवाय 20 ते 25 हजार अप्रत्यक्ष रोजगार ही मिळतील. त्यामुळे हे बंदर गेमचेंजर ठरणार आहे, असा विश्वास मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे. एनडीटीव्ही मराठीच्या 'NDTV मराठी मंच' या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी वाढवण बंदराचे महत्वा काय आहे याबाबत सविस्तर माहिती दिली. शिवाय ते भारताच्या विकासात कशा पद्धतीने हातभार लावणार आहे हे ही सांगितलं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा ))
जगात बंदर क्षेत्रात भारताची असलेली स्थिती समजवून घेणं हे गरजेचे आहे. ज्या ठिकाणी समुद्राची खोली जास्त अशा ठिकाणी बंदरं उभारली जातात. सर्वात खोल बंदर हे गुजरातमधील मुद्रा बंदर आहे, असं यावेळी बोलताना नितेश राणे यांनी सांगितलं. तेवढं खोलं बंदर देशात दुसरीकडे कुठे नाही. मात्र होवू घातलेलं वाढवण बंदर हे जास्त खोली असलेले बंदर ठरणार आहे. ते भारतातलं सर्वात मोठं बंदर ठरणार आहे, असं यावेळी राणे यांनी सांगितलं.
जगात पहिल्या 20 बंदरांचा विचार केला तर पहिल्या 10 मध्ये चीनच्याच बंदरांचा समावेश आहे. पण ज्या वेळी वाढवण बंदर तयार होईल त्यावेळी ते जगातल्या पहिल्या पाच बंदरात येणार आहे. आपण त्यावेळी महासत्ता असणाऱ्या देशांच्या स्पर्धेत येणार आहोत. शिवाय बंदरांच्या स्पर्धेत आपण प्रगत देशांच्या पंगतीत बसलेलो असू असंही त्यांनी सांगितलं. देशाची अर्थ व्यवस्था सुधारण्यातही याच वाढवण बंदराचा मोठा वाटा असणार आहे असा विश्वास ही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
NDTV Marathi Manch: 'राज्यातील तपासणी लॅबबाबत कडक कायदा..' आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मोठी घोषणा
या एका बंदारमुळे पालघर परिसराचा चेहरा मोहरा बदलणार आहे. शिवाय जवळपास 1 लाख थेट रोजगार वाढवणमुळे मिळणार आहेत असं राणे यांनी यावेळी स्पष्ट केलं. तर 20 ते 25 हजार इन डायरेक्ट रोजगार ही उपलब्ध असतील. दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी ही या बंदराचा उपयोग होईल. या बंदराच्या उभारणीत 26 टक्के वाटा हा राज्य सरकारचा आहे. जवळपास 3 हजार 40 कोटींची गुंतवणूक सरकार करणार आहे. अर्थ संकल्पात त्याची तरतूद करण्यात आली आहे. शिवाय त्याच खर्च ही सुरू केला आहे असं राणे म्हणाले. दरम्यान इथल्या स्थानिक मच्छीमारांवर अन्याय होणार नाही याची आम्ही काळजी घेत आहोत असंही त्यांनी स्पष्ट केलं. शिवाय स्थानिकांना नोकरीत इथं प्रथम प्राधान्य दिलं जाणारे आहे असं ही ते म्हणाले. त्यासाठी स्किल डेव्हलपमेंट मधून प्रशिक्षण दिलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं. या बंदराचा पहिला टप्पा लवकरच सुरू होईल यासाठी प्रयत्न आहे असं ते म्हणाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world