NDTV Marathi Manch Conclave: करिअरच्या नवीन वाटा आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होत आहेत. पायलट बनून विमान उडवणे अनेकांचा आकर्षण असते. मात्र पायलट कसं बनायचं याबाबत वायूदूत एज्युकेशन प्रा.लि.चे सीईओ गिरीश कांबळे यांनी मार्गदर्शन केलं. तर सेमीकंडक्टर क्षेत्रात भारताच्या नव्या संधी खुणावत आहेत, याबाबत RRP इलेक्ट्रॉनिक्सचे अध्यक्ष राजेंद्र चोडणकर यांनी सविस्तर माहिती दिली. एनडीटीव्ही मराठीच्या 'NDTV मराठी मंच' या विशेष कार्यक्रमात दोन्ही मान्यवरांना आपल्या क्षेत्रातील अनेक गोष्टी उलगडून सांगितल्या.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा ))
गिरीश कांबळे यांना सांगितलं की, पायलट ट्रेनिंग हा स्कील बेस जॉब आहे. त्याची बेसिक पात्रता आहे की दहावी पास आणि गणित आणि फिजीक्स. ग्रामीण भागातील मुले पायलट होऊ शकत नाहीत, हा खोटा समज आहे. आमच्याकडे कोल्हापूर, नागपूर सर्व भागातील विद्यार्थी आहेत, कोणीही पायलट होऊ शकतो. ज्याला दुचाकी येते तो पायलट होऊ शकतो. तो कुठलाही असो.
पायलट ट्रेनिंगमध्ये फंडिंग जास्त लागते. भारतात जर ट्रेनिंग घ्यायचे असेल ५० ते ६० लाख खर्च येतो आणि देशाबाहेर ६० ते ७० लाख खर्च येतो. त्यासाठी शैक्षणिक कर्जाची व्यवस्थाही आहे. पायलट सेक्टर करिअरची उत्तम संधी आहे, त्यामध्ये पगारही चांगला आहे. पायलट होण्यासाठी साधारण दोन वर्ष लागतात. वयाच्या २१ व्या वर्षी पायलय बनलेल्या तरुणांना दोन-अडीच लाख एवढा पगार मिळतो. दुसऱ्या कोणत्याही क्षेत्रात असा पगार मिळू शकत नाही, असं गिरीश कांबळे यांनी सांगितलं.
(नक्की वाचा- 'आम्हाला काश्मीरमध्ये हिंदू हॉटेल म्हणून टार्गेट करण्यात आलं,' केसरी टुर्सच्या मालकांनी सांगितला धक्कादायक अनुभव)
सेमीकंडक्टर क्षेत्रातील संधी
सेमीकंडक्टर चीप्स क्षेत्रातील संधींबाबत RRP इलेक्ट्रॉनिक्सचे अध्यक्ष राजेंद्र चोडणकर यांनी म्हटलं की, सेमीकंडक्टर चीप्स छोट्यातल्या छोट्या इलेक्ट्रिक वस्तूंमध्ये असतात. कोविडच्या दरम्यान चीप मॅन्युफॅक्चरिंगचं महत्त्व आम्हाला कळालं. सेमीकंडक्टर चीप्सबाबत आता आपण जे बघतोय ती कठीण परिस्थिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सेमीकंडक्टर चीप सोर्सिंगसाठी सबसिडीची घोषणा केली आहे. त्यामुळेच आपला देश हे सेमीकंडक्टर चीप उत्पादन वाढीचं चॅलेन्च घ्यायला तयार आहे.
सेमीकंडक्टर चीपबाबत खरी समस्या दोन वर्षांत निर्माण झाली. चीन आणि तैवानमधून आयात कमी झाल्यानंतर भारतात सेमीकंडक्टर चीप्सचं प्रोडक्शन वाढलं आहे. गुजरातमध्ये सेमीकंडक्टर चीप उत्पादक चार-पाच कंपन्या आहेत. महाराष्ट्रात आम्ही एकच आहोत. अदाणी समूह देखील यात उतरत आहे. महाराष्ट्र सरकारने आम्हाला खूप मदत केली. सेमीकंडक्टर चीप्स मॅन्युफॅक्चरिंग व्यवसायाचं देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झालं होतं. सेमीकंडक्टर चीप्स मॅन्युफॅक्चर इंडस्ट्री जटील आहे, पण यातून खूप रोजगार निर्माण होऊ शकतात. एक संपूर्ण अमेरिकन प्लान्ट भारतात आणण्याचा आमचा विचार सुरु आहे. ते झालं तर आम्ही सर्व प्रकारच्या सेमीकंडक्टर चीप्स तयार करू शकतो. राज्य सरकारने आम्हाला सबसिडी देखील दिली आहे.
( नक्की वाचा : NDTV Marathi Manch: 'पहलगाममधील हल्ल्याला जबाबदार असलेल्यांना धडा शिकवा', RSS ची मोदी सरकारकडं मागणी )
सेमीकंडक्टर चीप्स क्षेत्रात रिजेक्शन्स खूप आहेत. तुम्ही १०० चीप्स बनवल्या तर ८० रिजेक्ट होऊ शकतात. रिजेक्शन कंट्रोल केलं तर आमचे प्रॉफिट ३० टक्क्यांपर्यंत पोहोचतील. पंतप्रधान मोदींच्या धोरणामुळे अनेक टेक्नोलॉजी प्रोव्हायडर भारतात आहे. सरकारकडून सबसिडी मिळाली नसती तर सेमीकंडक्टर इंडस्ट्री सुरु करण्याची कुणी हिंमतही केली नसती. कारण यातील गुंतवणूक हजारो कोटींमध्ये आहे, असं राजेंद्र चोडणकर यांनी सांगितलं.